खडकवाडी येथे सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे भूमिपूजन

जनसेवेस सदैव प्राधान्य – सुजित झावरे पाटील.
दत्ता ठुबे
पारनेर प्रतिनिधी
आज खडकवाडी येथे सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या श्री महादेव मंदिर समोरील दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण करणे तसेच गावांतर्गत स्ट्रेटलाईट बसविणे इ. विकासकामांचे भुमिपुजन समारंभ सुजित झावरे पाटील यांचे शुभहस्ते करण्यात आले.
गेले अनेक वर्षापासून सदर प्रश्न प्रलंबित होता. सदर ठिकाणी विधी करणे देखिल शक्य नव्हते. अशातच सुजित झावरे पाटील एका दशक्रिया विधीप्रसंगी गावांतील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामस्थांना समोर सदर विषय मांडुन याबाबत लवकरच निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. अवघ्या १ महिन्याच्या आत सदर दशक्रिया विधी घाट सुशोभिकरण करणेसाठी निधी उपलब्ध करुन आज रोजी भुमिपुजन करुन कामाला सुरुवात करण्यात आली.
झावरे कुटुंबियाकडुन खडकवाडी गावांसाठी अदयापपर्यंत निधीची कमतरता भासू दिली नाही. स्व.आ. वसंतराव झावरे पाटील यांनी मांडओहोळ कालवाचे अस्तरीकरण करून खडकवाडीसाठी पाणी उपलब्ध करुन दिले. तसेच खडकवाडी सारख्या अतिदुर्गम भागात प्राथमिक आरोग्य केंद्र उपलब्ध करुन खडकवाडी तसेच या परिसरात आरोग्यांची सोय उपलब्ध करुन दिली. गावांतील बंधारे, रस्ते, क्रॉक्रीटीकरण, शाळा खोल्या असे अनेक कामे सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. गावांतील वेस देखिल सुजित झावरे पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मंजुर केली आहे. गावांतील अनेक प्रश्न सुजित झावरे पाटील यांच्या माध्यमातून सोडविण्यात आलेली आहे. खडकवाडी गावांतील विकासकामांसाठी कधीही निधीची कमतरता भासू देणार नसल्याने सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.

यावेळी खरेदी विक्री संघाचे संचालक बाबासाहेब खिलारी, विष्णुशेठ शिंदे, सरपंच शोभा आण्णासाहेब खिलारी, उपसरपंच अक्षय ढोकळे व्हा.चेअरमन आत्माराम गागरे, भाऊसाहेब खणकर, दिलीप पाटोळे, भाऊसाहेब सैद, जालिंदर वाबळे, शिवाजी शिंगोटे, नवनाथ बिचारे, सचिन ढोकळे, बाबासाहेब गागरे, भागा खणकर, विठ्ठल खणकर, संतोष ढोकळे, चेअरमन विश्वनाथ ढोकळे, मच्छिंद्र गागरे, किसन गागरे, अंबादास गागरे, अमोल म्हस्के, पोपटराव गागरे, सुभाष शिंदे, रघुनाथ ढोकळे, राजेंद्र ढोकळे, महादु गागरे, भाऊसाहेब रोहोकले, मिठुशेठ जाधव, शिवाजी मोढवे, गणेश बिचारे, मयुर रोकडे, शिवाजी रोकडे, अतुल गागरे, भिमाजी शिंदे, अशोक बर्डे, रामदास नवले, कविता रोकडे तसेच गावातील व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.