इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षातील कामगिरी जनते पर्यंत पोहचविण्याचे काम करा

शिर्डी दि 21

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षातील कामगिरी सोशल मीडियातुन जनते पर्यंत पोहचविण्याचे काम करा असे आवाहन हिमाचल प्रदेश प्रभारी तथा चंदीगड प्रदेश अध्यक्ष मा संजयजी टंडन यांनी केले.
शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाले बद्दल मोदी @९ अभियान अंतर्गत
सोशल मीडिया प्रभावीशाली व्यक्ती भेट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी श्री. टंडन बोलत होते. यावेळी महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, संघटन सरचिटणीस नितीन दिनकर, संयोजक नितीन कापसे, शिर्डी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर आदी उपस्थित होते.
श्री. टंडन बोलताना म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 9 वर्ष कार्यकाळात सेवा, समर्पण आणि गरीब कल्याण यासाठी कार्य करून 9 वर्षात भारत देश वेगाने विकासाच्या दिशेने जात सर्व समाजाचा विकास आणी समाजाची उन्नती करण्याचे स्वप्न केंद्रातील भारतीय जनता पार्टी चे सरकार यांच्या नेतृत्वाखाली साकार करित आहे. हे ९ वर्ष सेवा, समर्पण गरीब कल्याण साठी समर्पित आहे.
41 कोटींहून अधिक लोकांनी अत्यंत गरिबीतून बाहेर काढले. काँग्रेस च्या काळात गरिबी हटाव चा नारा दिला होता. गरीब हटाला पण गरिबी हटली नाही असा टोला त्यांनी मारला. देशातील 11 कोटी पेक्षा जास्त शेतकर्‍यांना पी एम किसान योजने अंतर्गत थेट खात्यात लाभ झाला आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकार कल्याणकारी योजना राबवीत असून डी बी टी द्वारे 28 लाखांहून अधिक लाभार्थी हस्तांतरित केले.80 कोटींहून अधिक लोकांना मोफत अन्न पुरवले. लसींचे 2.2 अब्ज डोस देण्यापासून ते जगातील सर्वात कमी मृत्यू दरांपैकी एक आणि अर्थव्यवस्था व्यवस्थापित करण्यापासून ते जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून उदयास येण्यापासून ते अखंड तंत्रज्ञानावर आधारित लसीकरणापर्यंत पोहोचण्यापर्यंत काम केले . स्वदेशी लस भारतातच बनवली, मोदीजींनी शस्त्रास्त्र विक्रेत्यांकडून खरेदी बंद केली. मोदीजींनी संरक्षण उपकरणे भारतातच बनवायला सुरुवात केली.
महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी
केंद्रातील भाजपा सरकारला नुकतेच नऊ वर्षे पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात देश विकासाच्या दिशेने जात असताना सर्व समाजाचा विकास आणि समाजाची उन्नती होण्याचे स्वप्न साकार प्रयत्न करत आहे.या देशाला भवितव्य दाखवणारा नेता नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपचे सरकार स्थापन झाले. भारतीय नागरिकांच्या बरोबरच इतर देशातील भारतीय नागरिकांच्या आशा पल्लवित झाल्या देशाचा विचार करणारा सर्व समाजाला बरोबर घेऊन जाणारा ज्यांचे “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास” हा मोदी सरकारचा मंत्र, भारतीयांचे अस्मिता असणारे प्रश्न पासून समाजातील शेवटच्या घटकाचा विकास करण्यासाठी मोदी सरकारने काम सुरू केले. असे मत व्यक्त केले.
सूत्रसंचालन योगीराज परदेशीं यांनी तर आभार जिल्हा संयोजक नितीन कापसे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सोशल मीडिया जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button