कोहोकडी येथे पाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आमदार लंके यांच्या पाठपुराव्यामुळे विकास कामांची घोडदौड। – सुदाम पवार
दत्ता ठुबे
पारनेर : प्रतिनिधी
मतदार संघातील जनतेने ६० हजारांच्या मताधिक्याने विधानसभेत पाठविल्यानंतर आमदार नीलेश लंके यांनी विविध विकास कामांसाठी पाठपुरावा केल्यामुळे मतदार संघात विकास कामांची घोडदौड सुरू असल्याचे प्रतिपादन माजी सभापती सुदाम पवार यांनी केले.
जल जीवन मिशन अंतर्गत कोहकडी येथील पाणी योजनेचे सुदाम पवार यांच्या उपस्थितीत रविवारी भूमिपूजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते
ते पुढे म्हणाले तालुक्याच्या विविध गावांमध्ये काही ना काही विकास कामे पोहचली आहेत. जल जीवन मिशन अंतर्गत अनेक गावांमध्ये पाणी योजना हाती घेण्यात आल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळातच या योजनांना मंजुरी मिळालेली आहे. असे असतानाही विरोधक या योजनांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. आमदार लंके यांनी कोरोना काळातही मोठ्या प्रमाणावर निधी खेचून आणला. मार्चमध्ये पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ८० कोटींचा निधी आमदार लंके यांनी मंजूर करून आणला. हा निधीही आम्हीच मंजूर केल्याचा बडेजाव विरोधक करू लागले होते. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बजेट बुक मधील पुरावेच पत्रकार परिषद सादर केल्यानंतर विरोधकांचा कपाळ मोक्ष झाला. त्यानंतर मात्र विरोधकांनी या निधीवर दावा करण्याचा प्रयत्न सोडून दिला. यावरून विरोधक केवळ आयत्या पिठावर रेघा मारण्यापुरतेच मर्यादित असल्याचे उघड झाले असल्याचे टीकाश्र पवार यांनी सोडले.
माजी सभापती पवार पुढे म्हणाले आमदार लंके यांनी विधानसभा सदस्य या नात्याने केलेली विकास कामे, सामाजिक भावनेतून सर्वसामान्य जनतेला दिलेला न्याय, कोरोना काळात शरदचंद्र पवार आरोग्य मंदिराच्या माध्यमातून हजारो रुग्णांची केलेली रुग्णसेवा यामुळे राज्यातच नव्हे तर देशात एक कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नगर दक्षिण मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्षम उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आमदार लंके यांच्या नावाला मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून ते आमदार लंके यांचे चारित्र्य चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांनी मंजूर केलेल्या कामांचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु आमदार लंके यांच्या कामाची पद्धत जनतेला माहिती असल्यामुळे विरोधकांच्या भूलथापांना कोणीही बळी पडणार नाही. मतपेटीतून मतदार विरोधकांना त्यांची जागा दाखवून देतील असा विश्वास पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
यावेळी सरपंच सीमा अरुण पवार, उपसरपंच सुनीता दत्तात्रय जांभळकर, माजी सरपंच डॉक्टर साहेबराव पानगे, दत्तात्रय कनीच्छे, रत्नेश्वर देवस्थानचे उपाध्यक्ष वसंतराव चौधरी, ग्रामपंचायत सदस्य कानिफनाथ टोणगे, शैला झरेकर, बाळासाहेब कनीच्छे, गोरक्ष टोणगे, सोनाली चाबुकस्वार, मीनाताई टोणगे, संगीता खांडेकर, विठ्ठल गायकवाड, प्राजक्ता गायकवाड, तेजसदादा चौधरी, माजी सरपंच लहानु टोणगे, शांताराम मल्लाव, रामदास पवार, विलास टोणगे, आकाश नवले, जयवंतराव गायकवाड आकाश नवले, जालिंदर दरेकर, माजी सरपंच महेश गोगडे, माजी सरपंच सतीश थोरात, पोपट गायकवाड, रामदास चौधरी, मच्छिंद्र चौधरी,भानुदास टोणगे, शहाजी टोणगे, सर्जेराव चौधरी आदी यावेळी उपस्थित होते.
गोगडे दांपत्याच्या हस्ते भूमिपूजन
पाणी योजनेच्या विहिरीसाठी जागा जागा देणाऱ्या भाऊसाहेब सिताराम गोगडे व त्यांच्या पत्नी कांताबाई भाऊसाहेब गोगडे यांच्या हस्ते तसेच सरपंच सीमा पवार व उपसरपंच सुनीता जांभळकर यांच्या उपस्थितीत योजनेचे भूमिपूजन करण्यात येऊन कामासही सुरुवात करण्यात आली.