इतर
सेंट्रल बँकेचे काशिनाथ भवारी यांचा सेवापूर्ती सोहळा

कोतुळ दि 25
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४० वर्षे प्रदीर्घ सेवा करून सेवानिवृत्त झालेले काशीनाथ लक्ष्मण भवारी यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे
२ जुलै २०२३ वेळ : सकाळी ११ वा
: घोटकरवाडी (सातेवाडी) तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर येथे. या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे
श्री भवारी यांनी सेंट्रल बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत संगमनेर, अकोले तालुक्यात सेवा केली सेवाकाळात अतिशय चांगल्या पद्धतीने विनम्र व तत्पर सेवा त्यांनी ग्राहकांना दिली या काळात त्यांच्या वरिष्ठांकडून अनेक वेळा गौरव करण्यात आला त्यांचा सेवाकाळ पूर्ण झाल्याने ते नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे यानिमित्ताने त्यांचा घोटकरवाडी येथे ग्रामस्थांच्या वतीने सेवापूर्ती सन्मान सोहळा आयोजित केला आहे