सोलापुरात शनिवारी महिला मेळाव्याचे आयोजन
सोलापूर दि28 पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघमच्यावतीने सोलापुरात शनिवारी एक जुलै 2023 रोजी सायंकाळी चार वाजता हैदराबाद रोड,विडी घरकुल परिसरातील प.पू.गुरूदेव श्री श्री रविशंकर समाज मंदिर बी ग्रुप मारुती मंदिर परिसर परिसरातील सभागृहात महिला मेळावा आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यात सध्याच्या घडामोडीवर महिलांना अपडेट करणे आणि महिलांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देणे, घरगुती उद्योगासंदर्भात माहिती देणे.विडी व्यवसायाला पर्याय व्यवसाय देणे हे या मेळाव्यामधून देण्याचा प्रयत्न पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली महिला संघाकडून करण्याचा मानस असल्याचे अध्यक्ष माधवी अंदे मो.8788970814 यांनी दिली आहे.
पूर्व भागात विशेषतः विडी घरकुल भागातील महिलांना संघटित करून त्यांना आर्थिक बळ आणि समाजातील चालू घडामोडींचे ज्ञान त्यांना असावं यासाठी पद्मशाली महिला संघमच्या वतीने शनिवारी या महिला मेळाव्याचे आयोजन केले आहे. या महिला मेळाव्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समाजात चालू असलेल्या घडामोडी, घरगुती उद्योग आणि भविष्यात भेडसावणारे गंभीर प्रश्न याबाबत त्यांना माहिती व्हावी यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
यामध्ये वकील, मुख्याध्यापिका ,डॉक्टर, पत्रकार, सौंदर्यतज्ञ व विविध सामाजिक संघटनेत कार्य करणारे सामाजिक महिलांचा मार्गदर्शन लाभणार आहे .यामध्ये रोटरी क्लब एमआयडीसीच्या अध्यक्षा सौ लता व्यंकटेश चन्ना ,मातोश्री जनाबाई जनार्दन बिटला प्रशालेच्या मुख्याध्यापिका शारदा गोरटयाल, लेखिका- निवेदिका व साहित्यिका रेणुका बुधारम, महिला प्रसूतीशास्त्रज्ञ डॉक्टर लता पाटील मिठ्ठाकोल, सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या पाच सहा वर्षांपासून वकिली व्यवसाय करणाऱ्या अडवोकेट सौ ज्योती राजेंद्र अल्ली आणि सौंदर्यतज्ञा हेमा गोसकी यांचं विविध विषयावर मार्गदर्शन होणार आहे. या मार्गदर्शन महिला मेळाव्यात सोलापुरातील जास्तीत जास्त महिलांनी सहभागी व्हावं असे आवाहन माधवी अंदे आणि त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांनी केली आहे