महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आषाढी पालखी सोहळा

पुणे दि 30 महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेच्या महिलाश्रम वसतिगृहात आज आषाढी एकादशीनिमित्त पालखी सोहळा व कीर्तनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला
छोटी कीर्तनकार कुमारी अनन्या वायाळ हिने आज सद्गुरु या विषयावर कीर्तन सादर केले यावेळी वसतिगृहातील हजार मुली कीर्तनात भारावून गेल्या यावेळी अनन्या वायाळ हिने गुरु शिष्य परंपरा हा विषय मांडला व प्रत्येकाच्या आयुष्यात गुरुला किती महत्त्व आहे हे समजावून सांगितले .
वसतिगृहातील विद्यार्थिनी कु.उत्कर्ष देशमुख व विनया बगाडे यांनी सूत्रसंचालन केले .वसतिगृहाच्या प्रमुख सुमन तांबे /यादव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व कीर्तनकार अनन्या वायाळ हिची ओळख करून दिली. लहान वयात कीर्तन ,संगीत, पोहणे, स्वसंरक्षणासाठी दंड व दानपट्टा चालवणे इत्यादी मध्ये तरबेज असलेली अनन्या वायाळ हिने तितक्याच ताकतीने आज किर्तन सादर केले .ही वसतिगृहातील मुलींसाठी प्रेरणादायी गोष्ट ठरली.यावेळी संस्थेच्या उपकार्याध्यक्षा माननीय विद्याताई कुलकर्णी या आवर्जून उपस्थित होत्या .त्यांनीही उपस्थित मुली तसेच अनन्या वायाळ हिचे कौतुक केले .

तसेच संस्थेच्या आवारात आयोजित केलेल्या पालखी सोहळ्यात सर्व मुली उत्साहाने सहभागी झाल्या व विठ्ठलाच्या नामस्मरणात पूर्ण वातावरण भक्तीमय होऊन गेले.