पारनेर तालुक्यात निकृष्ट दर्जाची कामे करणाऱ्या ठेकेदार व अधिका-यांना तडीपार करा,

पारनेर तालुक्यात पाझर तलावांची कामे निकृष्ठ दर्जाची -मनसे नेते अविनाश पवार
दत्ता ठुबे/पारनेर:-
पारनेर तालुक्यात जलसंधारण विभागाच्या वतीने पाझर तलाव दुरुस्तीची कामं चालु आहेत पण कामं ही इस्टीमेटप्रमाणे चालु नसुन ती निकृष्ठ दर्जाचीच असल्याचा गंभीर आरोप मनसेचे माथाडी कामगार सेना नेते अविनाश पवार यांनी केला आहे याबाबत त्यांनींजिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आहे
जलसंधारण अधिकारी आणि ठेकेदार मिळुन पारनेर तालुक्यात निकृष्ठ दर्जाची कामं करत आहेत.गेल्या वर्षी झालेली कामं ही सुद्धा निकृष्ठ दर्जाची झाल्यामुळे पाणी दोन महीने अगोदरच पर्कुलेशन होऊन वाहुन गेले असल्याचे शेतकरी बांधवांनी सांगितले असता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शेतकरी बांधवांना सोबत घेऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता पाझर तलाव दुरुस्ती करत असताना ठेकेदाराने मनमानी पध्दतीने काम करत तलावाच्या दर्जाबाबत हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले आहे.इस्टीमेटप्रमाणे कामं करणं बंधनकारक असताना सुद्धा तलावात पर्क्युलेशन होऊ नये म्हणुन जो चर खोदला जातो तो एक सारखा म्हणजे ३मिटर असायला हवा पण तोसुद्धा एक सारखा नसल्याचे निदर्शनास आले आहे तसेच तलावात वापरण्यात आलेला कागद तलावाच्या पुर्णपणे भरावाला टाकणं गरजेचं असताना सुद्धा फक्त मधोमध अर्धा कागद टाकण्यात आला आहे.५००मायक्राॅन दर्जाचा दर्जेदार कागद असायला हवा पण तो सुद्धा साधा वापरला असल्याने त्याच्या दर्जाबाबत हलगर्जीपणा केल्याचे दिसून आले आहे.
ठेकेदारांनी पारनेर तालुक्यातील सर्व पाझर तलावात सगळ्या ठिकाणी अशाच पद्धतीने कागद टाकल्याचे जलसंधारण अधिकारी यांच्यासमोर सांगितले.तलावावरील भराव दगडी पिचींग सुद्धा पुर्णपणे केली नसल्याने भविष्यात जर मोठा पाऊस झाला तर तलाव फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पारनेर तालुक्यातील जलसंधारण विभागाच्या वतीने पाझर तलाव दुरुस्तीच्या सर्व कामांची एक समिती नेमण्यात येऊन दर्जा संदर्भात सखोल चौकशी करून पहाणी करण्यात यावी, यामध्ये दोषी आढळल्यास अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी मनसे माथाडी कामगार सेना नेते अविनाश पवार यांनी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांची भेट घेऊन पुराव्यानिशी निकृष्ठ दर्जाच्या कागदाचा सॅम्पल देऊन चर्चा केली आहे. जिल्हाधिकारी यांनी सुद्धा लगेच संबंधित जलसंधारण विभागाकडे याची विचारणा करुन कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.