अकोले नगरपंचायत वर कमळ फुलले!

महाविकास आघाडीची बिघाडी
आमदार लहामटें नडली
अकोले प्रतिनिधी
अकोले नगरपंचायत च्या निवडणुकीमध्ये 17 पैकी 12 जागांवर विजय मिळवत भाजपाने नगरपंचायतवर कमळ फुलविले
अकोले नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस , शिवसेना व राष्ट्रीय काँग्रेस अशा लढती झाल्या
राज्यात महाविकासआघाडी असताना अकोले तालुक्यात नगरपंचायत मध्ये मात्र आघाडीची बिघाडी झाल्याने भाजपाला कमळ फुलविण्यात यश आले
काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना यांच्यातच निवडणूक प्रचारादरम्यान झालेली गरळ ओकने महाआघाडीला भोवले एकमेकांवरील आरोप-प्रत्यारोपांचे मुळे निवडणूक चांगलीच रंगली यामुळे महाविकासआघाडी ला नगर पंचायत मध्ये सत्ता स्थापनेपासून दूर जावे लागले
आहे नगरपंचायत निवडणुकीत आघाडीत सामील न होता काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढविली ही राष्ट्रीय काँग्रेसची अकोल्यात राजकीय आत्महत्या ठरली कॉंग्रेसला अवघ्या एका जागेवर खाते खोलता आले तर राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवत चार जागांवर यश मिळवले स्वतःचे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसला स्वतःचे हसू करण्याची वेळ काँग्रेस वर आली तर महा विकास आघाडीत राष्ट्रीय काँग्रेसला सोबत न घेता लढण्याचा पश्चातापही राष्ट्रवादी शिवसेनेला करावा लागला शिवसेनेला दोन आणि राष्ट्रवादी ला दोन आशा चार जागांवर समाधान मानाचे मानावे लागले मनसे आणि माकप यांना तर खातेही खोलता आले नाही

प्रभागनिहाय उमेदवार व त्यांना पडलेले मते…
प्रभाग क्र १
साै मंडलिक विमल संतु -(शिवसेना) — 416(विजयी)
श्रीमती मंडलिक अलका अशोक -( कॅाग्रेस)–245
श्रीमती मंडलिक सुरेखा पुंजा -10
प्रभाग क्र २
चाैधरी शिवाजी आनंदा ( राष्ट्रवादी)–84
चाैधरी सागर निवृत्ती ( भाजपा) –169(विजयी)
चाैधरी सागर विनायक ( कॅाग्रेस)—166
प्रभाग ३
पांडे मंदा तान्हाजी ( राष्ट्रवादी)–254
मनकर प्रतिभा वसंत (भाजपा)-481(विजयी)
नवले जयश्री दत्तात्रय (मनसे) –51
शिंदे ठकुबाई पोपट(शिवसेना)—06
प्रभाग ४
मैड श्रीकांत सुधाकर ( शिवसेना)–124
हीतेष रामकृष्ण कुंभार (भाजपा)–250(विजयी)
योगेश मुकुंद जोशी ( अपक्ष)–94
फैजान शमसुद्दीन तांबोळी (आय कॅाग्रेस)–153
प्रभाग ५
कानवडे गणेश भागुजी ( शिवसेना) -346
नाईकवाडी सोनाली लक्ष्मिकांत ( भाजपा)-416(विजयी)
गुजर हर्षल रमेश (मनसे)–07
प्रभाग ६
रुपवते श्वेताली मिलिंद ( राष्ट्रवादी) –363(विजयी)
घोडके शैला विश्वनाथ,(भाजपा)–290
रुपवते कांचन किशोर (कॅाग्रेस)–28
प्रभाग ७
शेख आरीफ शमसुद्दीन ( राष्ट्रवादी) –393(विजयी)
शेख मैनुद्दीन बद्रोद्दीन (भाजपा)–296
ताजणे सचिन सदाशिव ( मा.क.प) –90
प्रभाग ८
गायकवाड अशोक दत्तु ( राष्ट्रवादी)-288
वडजे बाळासाहेब काशिनाथ,(भाजपा)-557(विजयी)
गायकवाड जयराम विठोबा ( शिवसेना बंडखोर)-48
गायकवाड शिवाजी रामनाथ ( मनसे)-20
प्रभाग ९
रोकडे भिमा बबन( राष्ट्रवादी)–216
वैद्य शितल अमोल (भाजपा)–347(विजयी)
प्रभाग १०
शेटे नवनाथ विठ्ठल ( शिवसेना)–137(विजयी)
नाईकवाडी अनिल गंगाधर ( भाजपा)–92
शेटे मयुर (कॅाग्रेस) –62
शेणकर संदिप भाऊसाहेब (राष्ट्रवादी कॅाग्रेस बंडखोर)–92
नाईकवाडी प्रकाश संपतराव (अपक्ष)04
प्रभाग क्र ११
साै.वंदना भागवत शेटे ( राष्ट्रवादी कॅाग्रेस)-251
साै.वैष्णवी सोमेश्वर धुमाळ (भाजपा)— 258(विजयी)
साै.वनिता रामदास शेटे (कॅाग्रेस)–140
प्रभाग १२
कुरेशी निलोफर गफ्फार ( राष्ट्रवादी)–99
तमन्ना मोहसिन शेख (भाजपा)– 423(विजयी)
जाधव सुमन सुरेश ( कॅाग्रेस)–24
पवार अनिता शरद ( शिवसेना बंडखोर)–187
प्रभाग क्र १३
साै.आरती सुरेश लोखंडे (राष्ट्रवादी)–216
साै.जनाबाई नवनाथ मोहिते ( भाजपा)–268(विजयी)
साै.अंजली स्वप्निल कर्णिक (कॅाग्रेस)–52
प्रभाग क्र १४
पांडुरंग बाबुराव डमाळे ( राष्ट्रवादी) –188
शरद एकनाथ नवले (भाजपा) –267(विजयी)
राजेंद्र यादव नाईकवाडी (कॅाग्रेस) –252
प्रभाग क्र १५
नाईकवाडी संतोष कारभारी ( राष्ट्रवादी) — 97
शेटे सचिन संदिप ( भाजपा) –190
नाईकवाडी प्रदिपराज बाळासाहेब (कॅाग्रेस)–322(विजयी)
वर्पे अजय भिमराज ( शिवसेना बंडखोर)–03
प्रभाग क्र १६
कु भांगरे पूजा तुकाराम (राष्ट्रवादी)–92
शेणकर माधुरी रविद्र,(भाजपा)–147(विजयी)
भांगरे मिना प्रकाश ( कॅाग्रेस)– 142
प्रभाग क्र
पानसरे आशा रवींद्र ( राष्ट्रवादी)–156
शेळके कविता परशुराम ( भाजपा)–291(विजयी)
अकोले नगर पंचायत पक्षीय बलाबल
भाजप: १२
राष्ट्रवादी काँग्रेस: २
शिवसेना: २
काँग्रेस: १
भाजपाचे कमळ फुलवण्यासाठी माजी मंत्री मधुकरराव पिचड माजी आमदार वैभवराव पिचड यांनी नगर पंचायत निवडणुका जाहीर झाल्यापासूनच नियोजनपूर्वक लढाई सुरू ठेवली तर महाविकास आघाडीतील शिवसेना ,राष्ट्रवादी ,काँग्रेस, यांच्यातील अंतर्गत मतभेदामुळे उमेदवार जाहीर करेपर्यंत अंतर्गत मतभेद राहिले जागावाटपावरून आघाडी फिस्कटली ,जेष्ठ नेते अशोकराव भांगरे या निवडणुकी पासून काहीसे अलिप्त राहिले विद्यमान आमदार डॉक्टर किरण लहामटे ,जिल्हा बँकेचे माजी चेअरमन ज्येष्ठ नेते सिताराम पाटील गायकर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी अखेरपर्यंत खिंड लढवली मात्र काँग्रेस मित्र पक्षाच्या मत विभागणी मुळे शिवसेना राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले अकोले नगरपंचायत च्या या निकालावरून आगामी तालुक्याच्या राजकारणातील गणिते आणि आडाखे आता मांडली जाऊ लागले आहे लवकरच अकोले कृषी उत्पन्न बाजार समिती आणि अगस्ती सहकारी साखर कारखाना या निवडणुका होऊ घातल्या आहेत
––—————-