संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त माळी झाप येथे हरीनाम सप्ताह

अकोले (प्रतिनिधी)
अकोले माळीझाप येथे संत शिरोमणी सावता महाराज यांच्या संजीवन समाधी (पुण्यतिथी) निमित्त संत सावता महाराज समाज मंदिर माळीझाप येथे रविवार दिनांक ९ ते १६ जुलै या कालावधीत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रमोद मंडलिक , मच्छिंद्र मंडलिक यांनी दिली आहे.
तसेच दैनंदिन कार्यक्रम रोज पहाटे ४ ते ६: काकडा भजन, सकाळी ७ते१०: ज्ञानेश्र्वरी पारायण, दुपारी २ वा गाथा भजन ,सायं ६ ते ७ हरिपाठ, सायं ७ ते ९ श्री हरी किर्तन, रात्रौ ११ ते ४ पहाटे भजन व जागर दि. ९ जुलैला विठ्ठलपंत महाराज गोंडे ,१० जुलैला संदिप महाराज सिनारे,११ जुलैला कैलास महाराज आहेर, १२ जुलैला अनिताताई महाराज जाधव (गजे) , १३ जुलैला रविंद्र महाराज आहेर, १४ जुलैला उषाताई महाराज आळंदीकर, १५ जुलैला दौलत महाराज शेटे, यांचे किर्तन रोज सायंकाळी ७.०० ते ९.०० या वेळेत होईल. रविवारी १६ जुलैला सकाळी ८ ते १० वाजता श्री संत शिरोमणी सावता महाराजांचे प्रतिमेची सवाद्य दिंडी मिरवणूक, सकाळी १० ते १२ वाजता गोविंद महाराज करंजकर यांचे काल्याचे किर्तन होईल. त्यानंतर महाप्रसादहोईल. भाविकांनी वरील दैनंदिन कार्यक्रमाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन माळीझाप ग्रामस्थांनी केले आहे.