औषधी वनस्पतींविषयी संग्रहीत माहितीपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा

आकुर्डी ः डाॕ.डी.वाय.पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आणि डाॕ. डी. वाय.पाटील विद्यापीठाचे महामहिम कुलपती डाॕ. पी. डी. पाटील यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त डाॕ.डी.वाय पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि वनविभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ” मानवी आरोग्यसाठी औषधी वनस्पतींविषयी असलेले भारतीय पारंपरिक ज्ञान ” याविषयार राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन इकोसिटी, घाटघर, भंडादरा, कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्य ता. अकोले येथे करण्यात आले होते. या कार्यशाळेची ‘वनस्पतीशास्त्रज्ञ व कळसूबाई- हरिश्चंद्रगड अभयारण्यातील वैद्यांकडून औषधी वनस्पतींविषयी पारंपरिक ज्ञानाची संग्रहीत माहितीपुस्तिका तयार करण्यात आली होती. या माहितीपुस्तिकेचा प्रकाशन सोहळा डाॕ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी येथे पार पडला.
या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन डाॕ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे महामहिम कुलपती आदरणीय डाॕ. पी. डी. पाटील साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रकाशन सोहळ्यासाठी डाॕ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलगुरू डाॕ. एन. जे. पवार, कुलसचिव डाॕ. नरेंद्र कडू यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या प्रास्तविकात प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी माहितीपुस्तिकेच्या संपादन करण्यामागील हेतू व उद्देश आधोरेखित केला. या आदरणीय कुलगुरू डाॕ. एन. जे पवार यांनी माहितीपुस्तेकेसाठी शुभेच्छा देताना ही माहितीपुस्तिका समाज उपयोगी असून आयुर्वेदाविषयी भारतीय पारंपरिक ज्ञान जन सामान्यात पोहोचवणारी आहे असे मत व्यक्त केले. महामहिम आदरणीय कुलपती डाॕ. पी. डी. पाटील साहेब यांनी या माहितीपुस्तिकेच्या संपादन मंडळाचे कौतुक करून असे समाजहिताचे काम आपण महाविद्यालयाच्या माध्यमातून करून विद्यार्थ्यांसमोर एक आदर्श निर्माण करावा असे मांडले.
या माहितीपुस्तिकेच्या संपादनात डाॕ. मुकेश तिवारी, डाॕ. विजय गाडे, प्रा.मंजुषा कोठावदे, डाॕ. मिनल भोसले, डाॕ. वर्षा निंबाळकर,प्रा. सतिश ठाकर प्रा. खालिद शेख, प्रा. करिष्मा सय्यद, प्रा. अर्चना ठुबे, प्रा. रोहित वरडकर, प्रा. चेतन सरवदे प्रा. हेमल ढगे या सहभाग नोंदविला. या कार्यक्रमात प्रा. चेतन सरवदे यांनी PPT च्या माध्यमातून महाविद्यालयाचा पाच वर्षाचा आलेख मांडला.
या कार्यक्रमासाठी सौ. मनिषा पवार मॕडम, डाॕ. विशाल गायकवाड श्री. निलेश शिंदे, श्री. नंदकुमार खंडागळे याबरोबरच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक आणि प्रशासकीय कर्मचारी यांचे सहकार्य लाभले