कुकडी घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या सदस्यपदी सुजित झावरे पाटील यांची नियुक्ती

दत्ता ठुबे
पारनेर:-राज्यातील सर्वात दुष्काळी समजल्या जाणाऱ्या पारनेर तालुक्यामध्ये आपल्या अनोख्या कल्पकतेने दुष्काळी तालुका ही कायमची ओळख पुसून टाकण्यासाठी नदीजोडसारखी महत्वपूर्ण संकल्पना पारनेर तालुक्यात यशस्वी करुन दाखवणारे राज्यपाल पुरस्कार प्राप्त जि.प.चे मा.उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांची शासनाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्रातील महत्वपूर्ण असणाऱ्या तसेच पुणे,नगर,सोलापूर,उस्मानाबाद जिल्ह्यासाठी महत्वपूर्ण असणाऱ्या कुकडी घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्यपदी नुकतीच नियुक्ती झाली आहे.सुजित झावरे पाटील यांनी पारनेर तालुक्यात आतापर्यंत नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत काळकूप पाडळी नदीजोड प्रकल्प,वासुंदे कर्जुले पठार येथील ओहोळजोड प्रकल्प, काटाळवेढे येथील थळवाटी पाझर तलाव असे भरीव योगदान तालुक्यातील जलसंधारणाच्या दृष्टीने दिले असून यापुढील काळातही तालुक्यातील जनतेच्या दृष्टीने महत्वपूर्ण असणारा पठार भागाचा १ टीएमसी पाणी प्रश्न तसेच छोटे मोठे नदीजोड प्रकल्प राबवून पारनेरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
– सुजित झावरे पाटील यांची कुकडी घोड प्रकल्प कालवा सल्लागार समितीच्या अशासकीय सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तालुक्यातील जनतेच्या वतीने झावरे यांचे विविध स्तरांवर अभिनंदन होत असून कुकडी लाभक्षेत्रातील पारनेर तालुक्यातील गावांतील शेतकऱ्यांनी विशेष समाधान व्यक्त केले आहे.