इतर
क्रांतिकारकांच्या जन्म भूमित घुमणार आदिवासींचा जयघोष. ९ ऑगस्ट ला जागतिक आदिवासी दिनी अकोले शहराला येणार जत्रेच स्वरूप .

महाराष्ट्रतील सर्वात मोठा जागतिक आदिवासी दिन अकोले शहरात होणार
अकोले/प्रतिनिधी
- 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन देशभरासहीत महाराष्ट्रात सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या दिमाखात साजरा केला जातो अकोले शहरात देखिल दरवर्षी या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.या वर्षी देखील हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्यात साठी प्राथमिक बैठक अकोले विश्राम गृह अकोले येथे पार पडली.
- अकोले तालुका हा आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे , क्रांतिकारक राया ठाकर यांची जन्म भूमी म्हणून ओळखला जातो .या तालुक्यातील 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाला वेगळे महत्त्व प्राप्त होते.हजारो आदिवासी बांधव या निमित्ताने अकोले येथे येत असतात.या कार्यक्रमाची पूर्व तयारी म्हणून प्राथमिक बैठकीचे आयोजन केले होते .अकोले तालुक्यातील सर्वच गावांना तसेच आदिवासी समाजाच्या वाड्या वस्त्या वर बैठका आयोजित केल्या आहेत. आदिवासी समाजाची कला, संस्कृती, रूढी परंपरा या सर्व गोष्टींचे जतन होण्याकरिता या दिवशी अकोले शहरात आदिवासी समाजाचे कला पथके सामील होणार आहे.प्रत्येक विभागातून मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी होण्यासाठी गाव टू गाव,वाडी टू वाडी अशा बैठका आयोजित केल्या असून हा कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरा करण्याचा मानस सर्व पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.दिनांक 25 ते 30 तारखेच्या दरम्यान पुन्हा एक बैठक आयोजित केली जाईल त्या बैठकीत कार्यक्रमाची रूप रेषा ठरवली जाईल असा निर्णय घेण्यात आला.
- या बैठकीसाठी माजी उपसभापती मारुती मेंगाळ साहेब,सुरेश भाऊ पथवे,दिपक पथवे,सुनिल लोखंडे,पांडू लेंडे,वाळीबा भोईर,महेश कोकतरे, दत्ता तळपाडे,मणेश गभाले,शंकर कचरे,मारुती सोमा मेंगाळ,नारायण कचरे, वामन गोदके,नवशीराम खाडे,मावांजी अगिवले,विलास अगिवले,निलेश जाधव,नवनाथ मधे,कानु मधे,सागर साबळे,किसन पोकळे,राजू उघडे,नितिन भांगरे,आनंद भाऊ गिऱ्हे,शंकर गिऱ्हे,अर्जुन मेंगाळ,प्रवीण मेमाणे,खेमा पथवे,रामा पथवे,दिलिप पथवे,गंगाराम मेंगाळ,संजय फोडसे,फोडसे गुरुजी,दिनकर मेंगाळ,मधुकर मेंगाळ,नवनाथ मेंगाळ,सोमनाथ गोडे,नंदू खोकले,गोरख कुंदे,भरत दरेकर,अजय भांगरे,निलेश साबळे, केशव आवारी, नचिकेत आढळ,गुलाब तेलंम,पोपट मेंगाळ,नवनाथ मेंगाळ,संदीप डोके,राजू सावंत,गोरख पथवे,माऊली बांबळे,संतोष भोईर,कांताराम मेंगाळ, शंताराम मेंगाळ,सुनिल पथवे,तुकाराम मेंगाळ,दिपक पथवे,नामदेव मधे, ज्ञानेश्वर मेंगाळ, विलास खडके,ढवळा केव्हारी,नंदू म्हशाळ,आनंद साबळे,शिवाजी लेंडे,रोहित मुठे,गोगा बेंडकोळी,अशोक रावते,काशिनाथ मेंगाळ,रमेश खोडके,विष्णू कातोरे,रोहिदास पथवे,रोहित मधे,निवृत्ती उघडे,बुधा पथवे,रघु गावंडे,सागर मेंगाळ,रामचंद्र मेंगाळ,खंडे सर,कडाळे,चंद्रभान मेंगाळ,राहुल गोंदके,भरत गिऱ्हे,दामू गिऱ्हे,राजू कातोरे,आंबु कातोरे,विलास उघडे, अक्षय उघडे,हनुमंता पथवे,प्रकाश परते,नाना कोकतरे, राम जाधव,विशाल पारधी,दिपक पारधी,भाऊसाहेब पारधी, अक्षय मधे,रमेश कडाळे,तुषार मधे,सुधीर मधे,नंदू खोकले हिरामण उघडे,साहेबराव बेंडकोळी,गणपत डगळे,संतोष परते,सोमनाथ जोशी,वाळीबा धोंगडे,स्वप्निल खंडागळे, दत्तू मधे,मच्छिंद्र मधे,किरण जाधव,अविनाश जाधव यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.