बिबट्याच्या हल्यात वासराचा मृत्यु प्रचंड दहशत सोनई परिसरात बिबट्याची दहशत

सोनई –वांबोरी ( सोनई ) रोडवरील शिवाजी भूसारी यांच्या वस्तीवरील नागरिकाना दरोरोज बिबट्या परिसरात दर्शन देत असताना काल अचानक शिवाजी भूसारी यांच्या वस्तीवरील गावरण गायचे वासरुवर बिबट्याने हल्ला करुन मृत्युमुखी पाड़ल्याची घटना घड़ली आहे.
रोज परिसरात स्थानिक ग्रामस्थाना बिबटे दिसत आहे, त्यामुळे एक प्रकारे दहशत निर्माण झाल्याने शेतात रात्रि, अपरात्रि जाणे मुश्किल झाले आहे, महिलाही शेतात कामासाठी जाण्यास घाबरत आहे,
परिसरातील वस्तीवरील कुत्रे, शेळी, बकरी, छोटी छोटी वासरे, जनावरे, या हलयात जखमी देखील होऊन मृत्युमुखी झाल्याच्या घटना घड़ल्या आहे. या परिसरात बिबट्याची दहशत असून, नागरिक चितेत असून वन खात्याने पिजरा लावण्याची सेवानिवृत पोलिस उपनिरीक्षक शरद लिपाने यांनी केली आहे.
एकाच वेळी दोन दोन, तीन तीन, बिबटे फिरत आहे. रात्रीची विज असल्यामुळे अश्या वेळी शेतकरी शेतात जान्यासाठी घाबरत आहे.
*एकिकडे हाताला काम नाही, शेतीमालाला भाव नाही, रोजगार नाही, पैसा नाही, अशावेळी आर्थिक नुकसान झाले आहे, याची नुकसान भरपाई कोण देणार? वन्यप्रणीची हत्या केली तर मनुष्यवर कारवाई केली जाते, आता या वन्यप्रन्यानी वासरुची हत्याच केली आहे, आता संभादित विभाग कोणावर कारवाई करणार? असा सवाल उपस्थित करुन पिजरा लाउन, नुकसान भरपाई द्यावी,–सेवानिवृत सहा. पोलिस उपनिरीक्षक, शरद लिपाने.