आजचे पंचांग व राशिभविष्य दि २१/०७/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३० शके १९४५
दिनांक :- २१/०७/२०२३,
वार :- भृगवासरे(शुक्रवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:०४,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०७,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- अधिक श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०६:५९,(चतुर्थी),
नक्षत्र :- मघा समाप्ति १३:५८,
योग :- व्यतीपात समाप्ति १२:२३,
करण :- वणिज समाप्ति २०:१३,
चंद्र राशि :- सिंह,
रविराशि – नक्षत्र :- कर्क – पुष्य,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- दु. १२नं. चांगला दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी १०:५८ ते १२:३६ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४२ ते ०९:२० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:५८ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३६ ते ०२:१३ पर्यंत,
❀ दिन विशेष:
विनायक चतुर्थी, भद्रा २०:१३ नं., चतुर्थी श्राद्ध,
————–
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ ३० शके १९४५
दिनांक = २१/०७/२०२३
वार = भृगवासरे(शुक्रवार)
मेष
अचानक व्यवसायात होणारे बदल आश्चर्य कारक ठरतील. आज व्यवसाय, नोकरीत जास्त ताण पडेल. मानसिक द्वंद्व होईल. घराची जबाबदारी राहील. कुटंब आणि आर्थिक दृष्ट्या उत्तम दिवस. दिवस आनंदात जाईल.
वृषभ
आज दिवस शांततेने व्यतीत करण्याचा आहे . दशमात शनि वक्री , व्यय स्थानात ग्रह नुकसानीचे योग आणतील. प्रकृती जपा. पितृ चिंता संभवते. चतुर्थ चंद्र घरातआनंद निर्माण करेल. आर्थिक दृष्ट्या दिवस बरा.
मिथुन
काहीसा सामाजिक ताण उद्भवणार असून ईश्वरी पाठबळ राहील . खर्च खूप होईल. शनि लहान सहान दुखणी देईल..प्रवास टाळा. कोणालाही उधार देऊ नका. धार्मिक आणि आर्थिक दृष्ट्या बरा दिवस.
कर्क
दशमात गुरू राहू योग आहे. राशी स्वामी चंद्र द्वितीय स्थानात वैवाहिक जीवनात लाभाचे योग आणेल. संततिविषयी ताण अनुभव कराल.. गुरूचे पाठबळ व शुक्र नोकरीत चांगले फळ देईल . प्रकृती जपून काम करा. दिवस चांगला .
सिंह
राशीस्थानात चंद्र आणि राशीतील मंगळ शुक्र स्वतः वर फार खुश होऊ नकाअसे सांगत आहे. प्रकृतीची काळजी घ्या.. महत्वाचे निर्णय टाळा. गुरू भाग्यात उत्तम साथ देईल. दिवस गणेश पूजनात घालवा.
कन्या
सामाजिक आणि गृह क्षेत्रात काही कटकटी निर्माण होतील. प्रकृती नाजूक राहील. भाग्य चंद्र आर्थिक लाभ देणार असून कुटुंबीयांचे आरोग्याचे प्रश्न कमी होतील. संतती चिंतेत राहील. दिवस उत्तम. नामस्मरण करावे.
तुला
शुक्र मंगळ लाभात नोकरी मध्ये संधी देईल..अध्यात्मिक बाबीत खर्च भरपूर होईल .घरात सुखसोयी मध्ये वाढ होईल. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील . जबाबदारी येईल. संतती कडे लक्ष द्या . प्रवासात जपून रहा. दिवस मध्यम.
वृश्चिक
दशमात मंगळ चंद्र वृश्चिक व्यक्तीना नोकरी निमित्त प्रवास,बढती देईल. वडिलांची प्रकृती जपण्याचे संकेत देत आहे . प्रयत्न पूर्वक जागरूक रहा. वैवाहिक जीवनात वादळ येऊ शकते. विवाहसौख्य , आर्थिक, धर्म कारण यासाठी उत्तम फळ देईल . ईश स्मरण करावे.
धनू
गुरुकृपा आणि रवि बळ नोकरी व्यवसायात अडचणीतून मार्ग काढेल .पंचम गुरू व भाग्य चंद्र उत्तम सामाजिक दर्जा,आर्थिक भरभराट देईल.. प्रकृती ठीक राहील. संतती चिंता होईल. दिवस चांगला .
मकर
अष्टम चंद्र आणि अष्टम मंगळ यांचा योग आहे त्यामुळे कौटुंबिक जबाबदारी, आर्थिक नुकसानीचे योग बनत आहे. वैवाहिक जीवन मध्यम राहील. प्रवास योग येतील . जोडीदारासोबत वेळ घालवाल. दिवस पूजेत व्यतीत करा.
कुंभ
शनी राशीमध्ये वक्री भ्रमण करीत आहे. कुंभ व्यक्ती आज ताण अनुभव करतील. चंद्र घरात जास्त जबाबदारी निर्माण करेल . प्रकृती जपा. नातेवाईक भेट होईल . मुलांचे प्रश्न सुटतील. संतती , व्यवसाय नोकरी साठी मध्यम दिवस.
मीन
राशी स्वामी गुरु राहू सोबत असून परदेश गमन होईल. गुरूच्या धन स्थानातील ,उपस्थिती मुळे आर्थिक लाभ आणि कौटुंबिक जीवनात अनेक गोष्टींमुळे प्रसिद्धी असा हा काळ आहे. कार्यालयीन जीवनात सुधारणा होईल. . दिवस मध्यम..
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर