राजूर येथे स्व. शेलार यांच्या अस्थी विसर्जन ऐवजी वृक्षारोपण करून नवीन आदर्श.

राजूर /प्रतिनिधी :
समाजात आदर्शवत काम करणारे व सर्व सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत बनून राहणारे स्वर्गीय देविदास शेलार यांच्या अस्थी विसर्जन करण्याऐवजी शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेने एक आदर्श पायंडा पाडला असल्याचे प्रतिपादन राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश इंगळे यांनी राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विधालायत बोलताना केले.
श्री स्वामी समर्थ शिक्षण संस्थेचे कोषध्यक्ष व माजी आमदार वैभव पिचड यांचे स्वीय सहायक देविदास शेलार याचे नुकतेच हृदय विकाराने निधन झाले त्यांच्या jनिधनाने चाळीस गाव डांग भागात दुःख व्यक्त होत असताना त्यांच्या अस्थीकाही अंश शाळेच्या आवारात वृक्ष लागवड करून विसर्जन करण्यात आले
या वेळी आदिवासी उन्नती संस्थेचे उपाध्यक्ष सी.बी. भांगरे,उपसरपंच संतोष बनसोडे,संस्थेचे सचिव बापू काळे,जितेंद्र मोरे,कैलास रोकडे,सुरेश भांगरे,सयाजी अस्वले,गंगाराम धिंदले,विलास महाले,गोकूळ कानकाटे, सह ग्रामस्थ उपस्थित होते प्रसंगी सी.बी.भांगरे संतोष बनसोडे यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या प्रस्ताविक प्राचार्या मंजुषा काळे यांनी केले तर सुत्रसंचलन सारिका काळे यानी केले आभार उपसरपंच संतोष बनसोडे यांनी मानले