कान्हुर पठार जिल्हा परीषद गटात साडेसात कोटींच्या रस्ता कामांना मंजुरी : विश्वनाथ कोरडे

पारनेर/प्रतिनिधी
: कान्हुर पठार जिल्हा परीषद गटात मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा २ (संशोधन व विकास) अंतर्गत विधानपरीषद सदस्या सौ.उमाताई खापरे, खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या माध्यमातून व गिरीष महाजन, चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विशेष सहकार्यातुन साडेदहा कोटी रुपयांच्या रस्ता विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाल्याची माहिती भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य श्री.विश्वनाथ कोरडे यांनी दिली आहे.
श्री. कोरडे यांनी सांगितले की, स्थानिक नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत संबंधितांच्या अडचणी व गरज लक्षात घेऊन कामांच्या मंजुरीसाठी प्राधान्याने मागणी करण्यात आलेली होती. या गटात अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असुन भारतीय जनता पार्टीकडे असलेल्या सत्तेच्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असुन लवकरच विकासकामांच्या जोरावर या जिल्हापरिषद गटाचा चेहरा मोहरा बदललेला पाहावयास मिळणार आहे.
यावेळी कान्हुर पठार ते लोंढेमळा २ किमी. १.५० कोटी, कान्हुर पठार ते रानमळा २ किमी. १.५० कोटी, देवीभोयरे ते सरडे वस्ती १ किमी. ७५ लक्ष, वडझिरे ते निघुटमळा १ किमी. ७५ लक्ष, गांजीभोयरे ते पांढरेमळा रोड १.५ किमी. १ कोटी १२.५ लक्ष, पिंपळनेर ते रासकर वस्ती १ किमी ७५ लक्ष तर पानोली ते काळोखे मळा १.५ किमी. १ कोटी १२.५ लक्ष अशा एकुण सहा गावांतील सात ठिकाणच्या ७.५० कोटी रुपये प्रशासकीय रक्कम मंजुर असणाऱ्या १० किलोमीटर लांबीच्या रस्ता कामांना नुकतीच मंजुरी मिळाली असल्याचेही श्री कोरडे यांनी सांगितले असुन उर्वरीत कामांच्या मंजुरीसाठीही सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे ते म्हणाले.
जनसामान्यांचे नेतृत्व करत असताना जनतेच्या मागणीला पुरक असे कामकाज करण्यासह विविध प्रकारच्या मूलभूत सुविधा पुरवण्यात पारनेरच्या नेतृत्वांना अजुन खूप मोठा पल्ला गाठायचा आहे, याची जाणीव ठेऊन आपण सातत्याने राजकारणविरहीत सर्वसमावेशक विकासात्मक धोरण राबवत नागरीकांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्टे गाठण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार प्रयत्नशील असल्याने संबंधित उद्दीष्ठांपासुन पारनेर तालुका वंचित राहु नये हाच आपला सातत्याने प्रयत्न असल्याचेही कोरडे यांनी यावेळी सांगितले. विकासात्मक ध्येयाकडे अविरतपणे वाटचाल करत राहणे हेच आपलं धोरण असुन येत्या काळात तालुक्यातील जनतेच्या सर्वांगीन विकासाच्या दृष्टीने आपण पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली दमदार व विकासात्मक पाऊले उचलणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
▪️ – आदरणीय कोरडे दादांनी पानोली ते काळोखे मळा ह्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढून गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून ग्रामस्थ करत असलेल्या मागणीला न्याय दिला आहे. दोन माजी व एक आजी आमदारांना जे शक्य झालं नाही ते कोरडे दादांनी अनपेक्षितरीत्या शक्य करुन दाखविल्याबद्दल त्यांचे पानोली ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार.दिपक इंगळे, पानोली
▪️ – अतिवृष्टीमुळे ग्रामपंचायत मार्फत दळणवळणासाठी केलेली तात्पुरती उपाययोजना वाहुन गेली होती. संबंधित वस्तीवरील लोकांच्या होत असलेल्या गैरसोईबद्दल आजी माजी पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असतानही जनमानसांच्या अगचणींवर कायमस्वरूपी तोडगा काढल्याबद्दल कोरडे यांचे जाहीर आभार.सुभाष पांढरे, तंटामुक्ती अध्यक्ष, गांजीभोयरे
▪️ – संबंधित सरडे वस्तीवर साडेतीनशेच्या दरम्यान लोकवस्ती असुन सामान्यजनांना न्याय देण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या कोरडेंसारख्या नेतृत्वांचा सदैव अभिमान राहील.बाबुराव मुळे, देवीभोयरे
▪️ – कान्हुर पठार व पंचक्रोशीतील जनता नेहमी विकासाभिमुख नेतृत्वाच्या सोबत राहीलेली असल्याने कोरडेंनी कान्हुरपठार गावासाठी रानमळा व लोंढेमळा रस्त्यासाठी टाकलेला एकुण तीन कोटी रुपयांच्या निधीची परतफेड सन्मान व स्वाभिमानासह केली जाईल.
-अर्जुन नवले, ग्रामपंचायत सदस्य कान्हुर पठार