इतर

शेतीच्या वादातुन कुंभेफळ येथे हाणामारी अकोल्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल ०७ जणांना अटक

अकोले प्रतिनिधी —

शेतीच्या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन अकोले पोलिस स्टेशनला परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही बाजुचे ०७ जणांना अटक करुन न्यायालयाने २ पोलिस कोठडी सुनावली आहे
याबाबत पोलिसांकडुन मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील कुभेफळ येथील दोन भावाच्या कुटुंबातील शेतीचे वाद असताना ४ ॲगस्ट रोजी शेतातील गिन्नी गवत काढण्याच्या कारणावरून मारामारी होऊन गळ्यातील चेन घेऊन पळाल्याच्या परस्पर विरोधी गुन्हे दाखल होऊन दोन्ही कुटुंबातील ०७ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबद पहिल्या फिर्यादीत पूजा मनोहर पांडे यानी फिर्याद दिली असुन म्हटले आहे कि ४ ॲगस्ट २०२३ रोजी फिर्यादीचे पती मनोहर भाऊसाहेब पांडे व सासु चंद्रभागा भाऊसाहेब पांडे हे कोर्ट कामासाठी अकोलेत गेले असता फिर्यादी एकटी असताना १२:३० ते १:०० वा दरम्यान घराजवळ असलेल्या शेतामध्ये शुभांगी रविद्र पांडे,सिंधुबाई कारभारी पांडे या आमच्या शेतात येवून गिन्नी गवत,ज्वारी,घेवडा उपटण्यास सुरुवात केल्याने फिर्यादिने तिथे जाऊन हे क्षेत्र आमचे आहे त्यातील आमचे पिके उपटु नका असे म्हणाल्याने त्याचा राग आल्याने शुभांगी रविद्र पांडे,सिंधुबाई कारभारी पांडे यानी तुझ्या बापाची पेंड आहे का अशी शिवीगाळ करत फिर्यादीस लाथाबुक्क्यानी मारहाण केल्याने फिर्यादी खाली पडली असता काठीने हातावर,पाठीवर,मानेवर व डोक्यात मारहाण केली व फिर्यादी पतीला फोन लावत असतानाही मारहाण करुन फोन खाली पडला असता तो उचलून घेऊन गेल्या व नंतर दुपारी १ वा कारभारी रामु पांडे व रविद्र कारभारी पांडे फिर्यादीच्या घराजवळ येऊन तुझ्या बापाची पेंड आहे का असे म्हणून शिवीगाळ करु लागले यावेळी फिर्यादीची मुलगी घरात रडू लागल्याने फिर्यदी घरात गेली असता रविद्र पांडे तिच्यामागे घरात जावुन तिला ढकलुन गच्ची धरून गळ्यातील पोत घेऊन पळून गेला असल्याचे फिर्यादीवरुन शुभांगी रविद्र पांडे,सिंधुंबाई कारभारी पांडे,रविद्र कारभारी पांडे,कारभारी रामु पांडे यांच्यावर गु.र.न.४९४ भा.द.वी.कलम ३२७,४५२,३२४,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन चाैघाना अटक केली आहे तर दुसरी फिर्यादी शुभांगी रविद्र पांडे हिने दिली असुन यात म्हटले आहे कि ०४ ॲगस्ट रोजी पती व सासरे कोर्टाचे कामासाठी अकोलेत गेले असता फिर्यादी व तिची सासु सिंधूबाई कारभारी पांडे घरी असताना दुपारी १२:३० ते १:०० वा सुमारास पूजा मनोहर पांडे फि.शेतात येऊन शेतातील मका, बिन्नी गवत, सोयाबीन उपटत होती म्हणून फिर्यादी तेथे जावुन पूजा पांडे हिस तु आमच्या शेतातील पिके का उपटत आहे असे म्हटले असता तिने तुम्ही लई नाटके करता तुमच्या ….घालायचे का असे म्हणून लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरूवात केली तेव्हा फि.ची सासु सिधुबाई भंडण सोडवण्यासाठी मध्ये आली असता तिलाही तु लई माजली आहे तुझा माज उतरवते अशी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याने फि.व सासु दोघी घरी गेलेनंतर तिथे मनोहर भाऊसाहेब पांडे व चंद्रभागा भाऊसाहेब पांडे हे आले व फिर्यादी व तिची सासुला तुम्ही लई माजला तुमचा माज जिरवते असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरूवात केल्याने फिर्यादी व सासु घाबरून घरात गेले असता मनोहर पांडे व चंद्रभागा पांडे घरात घुसून फि.व सासुबाई यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असताना फिर्यादीचे पतीचे गाडीचा आवाज आल्याने मनोहर पांडे व चंद्रभागा पांडे यांनी फिर्यादिच्या गळ्यातील पोत तोडून घेऊन पळून गेल्याचे फिर्यादीवरुन पूजा मनोहर पांडे, मनोहर पांडे , चंद्रभागा पांडे याच्या विरूद्ध गु.र.न.४९५/२०२३ भा.द.वी.कलम ३२७,४५२,३२३,५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन तिघांना अटक करुन पोलिस कोठडी देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button