जैवविविधता माहितीपुस्तिका प्रकाशन सोहळा संपन्न

पुणे ः डाॕ. डी.वाय. पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, आकुर्डी या महाविद्यालयाने ‘जैवविविधतेची माहिती देणार जी माहितीपुस्तिका प्रकाशित केली. तिचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या २०१९-२०, २०२०-२१, २०२१-२२ या वर्षाच्या पुरस्काराचे वितरण नुकतेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडले. त्या पुरस्कार वितरण सोहळ्यात करण्यात आले.
या माहितीपुस्तिकेचे प्रकाशन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डाॕ. प्रफुल्ल पवार, व्यवस्थापन परिषद सदस्या बागेश्री मंथाळकर, प्राचार्य डाॕ. नितिन घोरपडे, श्री. शिंगणापूरकर, प्राचार्य डाॕ. वायदंडे, श्री. प्रसन्नजित फडणवीस , राष्ट्रीय सेवा योजना संचालक डाॕ. सदानंद भोसले, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डाॕ. अभिजीत कुलकर्णी , रा.से.यो. चे माजी संचालक डाॕ. प्रभाकर देसाई, प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांच्या हस्ते करण्यात आले.
महाविद्यालयाने राष्ट्रीय सेवा योजना, विद्यार्थी विकास मंडळ यांच्या माध्यमातून जी वेगवेगळी जैवविविधता शिबिरे घेतली त्या शिबिरांची माहिती तसेच भीमाशंकर अभयारण्यातील वनस्पतीची माहिती या माहितीचे संकलन या माहितीपुस्तिकेत केले आहे. या माहितीपुस्तिके बाबत प्रकाशनप्रसंगी प्राचार्य डाॕ. मोहन वामन यांनी उपस्थितांना माहिती दिली.
सदर माहिती संकलित करून माहितीपुस्तिका प्रकाशित केल्याबद्दल डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय डॉ. पी. डी. पाटील साहेब, उपाध्यक्षा आदरणीय डॉ. भाग्यश्रीताई पाटील मॅडम, सचिव आदरणीय डॉ. सोमनाथदादा पाटील आणि विश्वस्त आदरणीय डॉ. स्मिता जाधव मॅडम यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांचे कौतूक केले.