इतर

उंचखडक बुद्रुक मध्ये आदिवासी दिन साजरा

अकोले प्रतिनिधी

उंचखडक बुद्रुक मध्ये आदिवासी दिन साजरा करत “माझी माती,माझा देश” या योजनेची अंमलबजावणी करत पंचप्रण शपथ घेतली..!!

दिनांक ०९ ऑगस्ट २०२३ रोजी अकोले तालुक्यातील उंचखडक बुद्रुक गावात जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी क्रांतिकारक बांधवांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी उंचखडक बुद्रुक गावचे माजी सरपंच विद्यमान उपसरपंच तसेच बुवासाहेब नवले मल्टीस्टेटचे संचालक श्री.महिपाल देशमुख यांनी आदिवासी दिनाचे महत्त्व सांगत अभिवादन व विद्यार्थ्यांसोबत भारतास २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करत देशात एकात्मता बलशाली करुन देशाच्या संरक्षण करणाऱ्यांप्रती सन्मान बाळगून सर्व कर्तव्यांचे पालन करण्याची “माझी माती माझा देश या योजनेची अंमलबजावणी म्हणुन पंचप्रण शपथ घेण्यात आली तसेच उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य श्री.संजयजी गावंडे यांनी वीर क्रांतीकारी रोघोजी भांगरे यांच्या स्मृतीस पुष्पहार घालून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच आदिवासी संस्कृतीचे जतन केल्याने सामाजिक सलोखा कायम राहण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.

शाळेचे मुख्याध्यापक श्री रुपवते सरांनी कार्यक्रमाचे आयोजन करत सुत्रसंचलन केले आदिवासी दिनाचे औचित्य साधून उंचखडक बुद्रुक ग्रामपंचायत मार्फत “शासन आपल्या दारी” “योजना कल्याणकारी,सर्वसामान्यांच्या दारी..!” या अभियानाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमांना विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे जेष्ठ संचालक मार्गदर्शक शांताराम आप्पा देशमुख,मा.व्हा.चेअरमन मनोहर देशमुख,मा.उपसरपंच सुगंधराव देशमुख,देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देवराम पाटील शिंदे,जेष्ठ मार्गदर्शक लक्ष्मणराव मंडलिकबाबा,ग्रामसेवक भाऊसाहेब आवारी,भाऊसाहेब देशमुख,राधाकाकु मंडलिक,भाऊसाहेब शिंदे,राजेंद्र शिंदे,शामराव देशमुख,सुनिल देशमुख,सुदाम शिंदे,चंद्रकांत देशमुख,सोपान खरात,अक्षय देशमुख आदी ग्रामस्थ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button