आंबेवगण येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी गजाआड

.राजुर पोलीसांची दमदार कामगीरी
विलास तुपे
राजूर /प्रतिनिधी
राजुर पोलीस स्टेशन हद्दीतील आंबेवगण, ता. अकोले, जि. अहमदनगर या गावाच्या शिवारात राहणारे धोंडु पांडुरंग खेताडे हे त्यांचे वडील पांडुरंग खेताडे व आई विमल खेताडे असे त्यांचे राहते घरी असतांना इसम नामे 1) बबलु कदम 2) प्रमोद घारे, दोन्ही रा. मान्हेरे, ता. अकोले व त्यांचे मित्र 3) विकास गभाले 4) वैभव डगळे 5) वैभव गभाले 6) सागर भोईर 7) अक्षय कोंडार 8 ) विठ्ठल पोटकुले 9) विनोद शिंदे 10) नकुल मुंढे व इतर 3 ते 4 अनोळखी इसम यांनी धोंडु पांडुरंग खेताडे हे सचिन इदे यास त्याचे व बबलु कदम याच्या सोबत असलेले वाद मिटवुन घे असे म्हणाल्याचा राग मनात धरुन हातात लाकडी दांडके घेवुन त्यांच्याकडील मोटार सायकलीवर धोंडु खेताडे यांच्या घरी येवुन त्यांच्या घरात घुसुन त्यांतील एकाने घराच्या दरवाज्याची कडी आतुन लावुन घेवुन धोंडु खेताडे व त्याचे आई वडील यांना लाकडी दांडक्यांनी व लाथा बुक्यांनी मारहाण करुन धोंडु खेताडे व त्याची आई विमल खेताडे गंभिररित्या जखमी करुन त्याचे वडील पांडुरंग सोमा खेताडे, वय 50 वर्ष, रा. आंबेवंगण, ता. अकोले, यास जिवे ठार मारले होते. त्याबाबत फिर्यादी धोंडु पांडुरंग खेताडे, वय 25 वर्ष, रा. आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर यांनी राजुर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारी वरुन राजुर पोलीस स्टेशनला गु.र.नं 261/2023 भा. द. वी कलम 302, 324,323,452, 342, 143, 147, 148, 149, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास राजुर पोलीस स्टेशन करित आहे.
सदर गुन्ह्यात तपास करत असतांना राजुर पोलीस स्टेशन चे सहायक पोलीस निरीक्षक प्रविण दातरे यांनी वरिल नमुद आरोपीचा शोध घेणे कामी दोन पथके तयार करुन गुन्ह्यातील नावे निष्पन्न असलेल्या वरिल नमुद सर्व आरोपीतांना दोन तासांच्या आत ताब्यात घेवुन त्यांच्या कडे सखोली चौकशी केली असता त्यांनी संगनमत करुन सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने वरील सर्व आरोपी यांना नमुद गुन्ह्यात अटक करुन गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे. सदरची कारवाई मा. राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहमदनगर, श्रीमती स्वाती भोर मॅडम अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपुर, सोमनाथ वाकचौरे, उपविभागिय पोलीस अधिकारी, संगमनेर विभाग संगमनेर याच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक, प्रविण दातरे, पोलीस उपनिरीक्षक जी.एफ शेख, पोहेकॉ / मुंढे, पोहेकॉ / नेहे, पो ना / डगळे, मपोना / वाडेकर, पो कॉ / अशोक गाढे, पो कॉ /सुनिल ढाकणे, पो कॉ / अशोक काळे, पो कॉ / साईनाथ वर्पे, पो कॉ सचिन शिंदे, पो कॉ फटांगरे, यांनी केली असुन गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि प्रविण दातरे हे करीत आहेत.