इतर

महर्षी अगस्तीमुनी दर्शन या संकलित उपासना ग्रंथाचे प्रकाशन.

.
अकोले (प्रतिनिधी) ‘

महर्षी अगस्तीमुनी दर्शन ‘या संकलित उपासना ग्रंथाचे प्रकाशन येथील अगस्ती आश्रमात विख्यात शिल्पकार प्रमोद कांबळे व प्रसिद्ध गायिका प्रा.डॉ.धनश्री खरंडीकर यांच्या हस्ते करण्यात आले.भक्तिमय वातावरणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे जीवनव्रती कार्यकर्ते दिलीपजी महाजन होते.तर प्राचार्य डॉ.अनिल सहस्त्रबुद्धे विशेष अतिथी म्हणून उपस्थीत होते.
प्रमोद कांबळे अयोध्या रामजन्मभूमी मंदिर प्रकल्पातील सहभागी शिल्पकार असून येथील अगस्ती मुनी उत्सव मूर्ती शिल्प त्यांनी साकारले आहे.महर्षी अगस्तीमुनींच्या जीवनावरील ‘जातकयज्ञ ‘या संगीत नाटकाचे दिग्दर्शन धनश्री खरवंडीकर यांनी केले आहे.
प्राचार्य डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेल्या ‘
‘अगस्त्य माहात्म्य’ श्री ऋषी लोपामुद्रा चरित्र्य आणि ‘अगस्त्य अभंगावली’ या तीन उपासना ग्रंथांचा समावेश ‘महर्षी अगस्तीमुनी दर्शन’ या उपासना ग्रंथात असून या ग्रंथाच्या एक हजार प्रति लोकसहभागातून छापण्यात आल्या असून त्या अगस्ती देवस्थानला अर्पण करण्यात आल्या.
अगस्ती ऋषींच्या जीवनावर आपण लिहिलेल्या
‘अगस्त्य’या कादंबरीचे आजपर्यंत इंग्रजी हिंदी आणि कन्नड भाषेत अनुवाद झाले असून लवकरच ही कादंबरी तामिळ भाषेतही प्रसिद्ध होणार असल्याची माहिती डॉ.सहस्त्रबुद्धे यांनी या वेळी दिली.या आश्रमात अगस्ती शिल्पसृष्टी निर्माण व्हावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
देशभरातील हजारो शिल्पकारांमधून आपली रामजन्मभूमी प्रकल्पातील शिल्पे साकारण्यासाठी झालेली निवड ही आपल्या आयुष्यातील सर्वात मोठी पावती असल्याचे प्रमोद कांबळे यांनी सांगितले.मी केवळ निमित्तमात्र ,कोणतीतरी शक्ती आपल्याकडून काम करून घेत आहे अशी पुष्टीही त्यांनी जोडली.अगस्ती आश्रम परिसराचा कलात्मक दृष्टीने विकास करण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.अगस्तीऋषी आशीर्वाद देतील त्या प्रमाणे करू असे ते म्हणाले.
धनश्री खरवंडीकर यांनी जातकयज्ञ नाटक दिगदर्शनातील अनुभव सांगितले.अगस्ती ऋषींची अधिकाधिक सेवा करण्याची संधी आपणाला मिळावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अलका पवार यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
अगस्ती देवस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष के.डी.धुमाळ यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
ग्रंथनिर्मिती प्रकल्पाचे प्रमुख मोरेश्वर धर्माधिकारी यांनी उपक्रमाची माहिती दिली.ग्रंथ निर्मितीस आर्थिक तसेच अन्य प्रकारे सहकार्य करणारे अनिल सोमणी, मोरेश्वर धर्माधिकारी,सतीश मालवणकर,रामनाथ आरोटे,अनिरुद्ध शाळीग्राम,अलका पवार,सारंग जोशी,अभय विसाळ,अतुल शाळीग्राम,ट्रस्टचे अध्यक्ष के डी धुमाळ,श्रीपाद कुलकर्णी,अरुणशेठ झंवर यांचा या वेळी ग्रंथ भेट देऊन सन्मान करण्यात आला.अनिल सोमणी व
राजेंद्र महाराज नवले यांनी सूत्रसंचालन केले.तर व्यवस्थापक रामनाथ मुतडक यांनी आभार मानले.प्रारंभी डॉ. धनश्री खरवंडीकर यांच्या नेतृत्वाखाली श्रुतिसंगीत च्या कलावंतांनी अगस्त्य अभांगवलीतील अभंगांचे गायन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button