राजूर येथील सर्वोदय विदया मंदिर येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात

.
राजूर/प्रतिनिधी-
भारत माता कि जय, जय जवान जय किसान,वंदे मातरम, भारतीय स्वातंत्र्य दिनाचा विजय असो अशा घोषणा देत, स्काऊड गाईडचे नियोजनबद्ध संचलन, प्रभातफेरी यांसारख्या कार्यक्रमांनी सत्यनिकेत संस्था राजुर येथील गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक विजय पवार यांचे हस्ते विदयालयाचे ध्वजारोहन करण्यात आले.
याप्रसंगी विजेंद्र पवार, संदिप पवार, टि.के. महाले, विनय सावंत,रमाकांत डेरे, एम.के. बारेकर, मच्छिंद्र जगदाळे,विलास पाबळकर प्राचार्य भाऊसाहेब बनकर, उपप्राचार्य आण्णासाहेब धतुरे, पर्यवेक्षक सदाशिव गिरी, माजी प्राचार्य मनोहर लेंडे, लहानु पर्बत यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विदयार्थी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
