शनि शिंगणापुरात शनी भक्तांची मंदियाळी!

विजय खंडागळे
सोनई- श्रावण महिन्याच्या पहिल्या शनिवारी पहाटे 4 वाजल्या पासून परिसरातून, तालुक्यातील भाविक पायी येऊन चौथारा शनि दर्शन, जलभिषेक करुन ओल्या वस्राने शनिदर्शन घेतले. दरम्यान देवस्थान प्रशासनने घेतलेल्या दोन तास मोफत चौथारावरील शनिदर्शन मुळे अलोट गर्दी पहवयास मिळाली. शनिवार नेहमीची गर्दी, व परिसरातील गर्दी एकच झाल्याने दिवसभर भविकांचा ओघ चालूच होता. शनिदेवला श्रावण महिन्यात जलभिषेक करण्याची परपरा असल्याने भाविकानी स्नान करुन दर्शन घेतले. ठीकठिकाणी भाविकाना प्रसादचे वाटप करण्यात येत होते.
राज्याचे माजी मंत्री आ. शंकरराव गडाख, जिल्हा परिषदचे बाधकाम समितिचे माजी सभापति सुनील गडाख, आदिनी शेतकरी राजासाठी पाऊस पड़ावा व भरभरून पिकाची समृद्धि व्हावी, अशी प्रार्थना करुन शनीचरनी साकडे घातले*.
ग्रामीण भागातून टाळ, मृदुंग, पखवाज सह रुढ़ी परापरेनुसार चारही शनिवारी दिंडी दाखल होऊन पांडुरंगचे अभग गात दर्शन घेण्यासाठी आल्यामुळे सम्पूर्ण परिसर भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
मान्यवराचे देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सरचीटणीस दिपक दरदले, पोलिस पाटील , सयाराम बानकर आदिनी स्वागत केले.