परदेशात शिक्षणा बरोबरच आपले संस्कार वृध्दींगत करावे — वैभव पिचड

विलास तुपे।
राजूर प्रतिनिधी
देशात मिळालेली संस्काराची शिदोरी ऋषिकेश याने घेऊन परदेशात आपल्या शिक्षणाबरोबरच आपले संस्कार वृध्दींगत करून देशाबद्दल असणारे प्रेम ,जिव्हाळा टिकवून देशाचा तिरंगा साता समुद्रापार रोवावा, ह्रुदयात ठेवावा असे आव्हान माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे बोलताना केले .
श्री स्वामी समर्थ माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी ऋषिकेश काळे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड मध्ये जात असल्याने स्वामी समर्थ शिक्षण संस्था, राजूर ग्रामपंचायत,पेसा सरपंच परिषद महाराष्ट्र राज्य,अहमदनगर तैलिक महासभा,अकोले तालुका पत्रकार संघ,माजी विद्यार्थी संघ, प. पू.गगनगिरी महाराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यालयात सत्कार व सदिच्छा समारंभ संपन्न झाला . मा.आमदार वैभव पिचड यांच्या शुभहस्ते व आदर्श माजी सरपंच सौ.हेमलता पिचड यांचे अध्यक्षतेखाली झाला .यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सीताराम भांगरे,जालिंदर वाकचौरे,अकोले तालुका मेडिकल असोशियाशन चे किशोर काळे, सरपंच परिषदेचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत गोंदके,उपसभापती दत्ता देशमुख, संस्थेचे सचिव बापू काळे,माधव गभाले,उपसरपंच गोकुळ कानकाटे,माजी सरपंच संतोष बनसोडे,अनंत घाणे,सुरेश गभाले,व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे,श्रीनिवास एलमामे,भीमाशंकर कवडे, मच्छिंद्र देशमुख,प्रकाश महाले,विनायक घाट कर,विनायक माळवे, विलास तुपे,दिलीप पाबळकर,नंदू बाबा चोथवे, शेखर वालझाडे,तैलिक समाजाचे देविदास शेलार,हबीब मणियार,उपस्थित होते.प्रास्तविक विनायक साळवे यांनी केले. प्रसंगी बोलताना माजी आमदार वैभव पिचड म्हणले आपण आदिवासी ग्रामीण भागातील आहोत हा न्यूनगंड बाजूला सारून आपल्या सुप्त गुणांचा वापर करून काम केल्यास ऋषिकेश काळे सारखे विद्यार्थी आकाशाला गवसणी घालतात कोणत्याही प्रकारची ट्युषण नसताना तो परदेशात जाण्यासाठी असणारी परीक्षा व निकस पात्र करून तो इंग्लंड देशात जात आहे.त्याच्यात असलेले संस्कार बुद्धिमत्ता त्याला निश्चित यशाचे शिखरावर नेईल याची मला खात्री आहे.असे विद्यार्थी तालुक्यातून तयार व्हावेत ही अपेक्षा तर यावेळी श्रीनिवास एलमामे,श्रीराम पन्हाळे,चंद्रकांत गोंदके,प्रा.मच्छिंद्र देशमुख यांनी आपल्या भाषणात ऋषिकेश काळे यांच्या अनेक पैलू बाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.तर ऋषिकेश काळे यांनी तुम्ही तुमच्यावर विश्वास ठेवा सकारात्मक भूमिकेतून काम केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नाही .आदिवासी भागात व समाजात तुम्ही जनमले हे तुमचे भाग्य आहे. माझ्या यशात माझे आईवडील शिक्षक मित्र यांचा मोठा वाटा आहे .तर माजी आमदार वैभव पिचड,मातोश्री सौ. हेमलता पिचड यांनी दिलेला वेळ माझ्या स्मरणात राहील
तर सौ.हेमलता पिचड यांनी स्वामी समर्थ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडतात तर ऋषिकेश काळे अभियांत्रिकी शिक्षण घेण्यासाठी इंग्लंड मध्ये जात आहे त्यामागे आईवडील यांचे कष्ट व त्याची गुणवत्ता महत्वाची आहे.सूत्रसंचलन किरण भागवत आभार सौ.मंजुषा काळे यांनी मानले.