संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील नूतन कला महाविद्यालयात ग्रंथालय दिन साजरा

संगमनेर प्रतिनिधी
ग्रंथ हेच गुरु. संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील प्रागतिक शिक्षण संस्थेच्या नूतन कला महाविद्यालयात दिनांक 28/08/ 2023 रोजी ग्रंथालय दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी प्रसिद्ध व्यंगचित्रकार श्री अरविंद गाडेकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुभाष कडलग यांनी केले. तसेच संस्था पदाधिकारी श्री भारत शेलकर अध्यक्ष म्हणून लाभले होते.

श्री अरविंद गाडेकर यांनी आपल्या मनोगतातून वाचनाची आवड गरज व महत्त्व स्पष्ट केले तसेच आपल्या व्यक्तिमत्व विकासात ग्रंथालयाचा खूप मोठा वाटा असतो त्यामुळे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा असे मत त्यांनी मांडले.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयातील तृतीय वर्ष वाणिज्य विभागातील विद्यार्थिनी साक्षी हासे हिने सांगली येथील राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला व महाविद्यालयातील द्वितीय वर्ष कला शाखेतील विद्यार्थी सक्षम देशमुख याने ग्रंथालयासाठी नोट्स व पुस्तके भेट स्वरूपात दिली.

सदर कार्यक्रमाचे नियोजन महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल वाडेकर आरती यांनी सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मदतीने केले होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव गडाख यांनी केले तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रा. वाळुंज मॅडम यांनी दिला तसेच आभार प्रदर्शन विज्ञान विभागाचे उपप्राचार्य वर्पे सुभाष यांनी केले.