स्व. घुलेमुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली – महादेव मासाळकर

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
स्व. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी बहुजन समाजातील मुलामुलींसाठी ग्रामीण भागात शिक्षणाची दारे खुली केल्यामुळेच गोरगरिबांचे संसार उभे राहिले झोपडीतील मुल मुली शिकू शकली असे प्रतिपादन प्राचार्य महादेव मासाळकर यांनी केले
जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खानापूर येथे आयोजित लोकनेते मारुतराव घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते
यावेळी बोलताना ते म्हणाले की ज्ञानेश्वर कारखान्याचे माध्यमातून हजारो कुटुंबाना रोजगार तसेच परिसराच्या विकासाला चालना देण्याचे काम त्यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे संजय भुसारी यांनी केले तर कु पूनम काकडे,कु प्रतीक्षा चेडे, यांची भाषणे झाली.
स्पर्धेमध्ये प्रथम ,द्वितीय,तृतीय क्रमांक विजयी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देवून गौरविण्यात आले यावेळी विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय भुसारी ,प्रवीण भराट ,एस एस शेख, प्रा तुळशीराम खताळ ,प्रा महेश थोरात संदीप थोरात, प्रा बाबासाहेब भुसारी ,सौ शितल थोरात मॅडम,अजित देशमुख ,दीपक मगर करण राज बल्लाळ,विकास व्यवहारे, गोरक्षनाथ मडके टाकळकर सर बबन आव्हाड यांनी परिश्रम घेतले.