पद्मशाली सखी संघमचे ‘लोगो’ आणि ‘ब्रीदवाक्याचे’ थाटात अनावरण.

सोलापूर – श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशनचे लोगो आणि ब्रीदवाक्य ‘नवनवीन कल्पनांच्या विचारांना उभारी देवूया’.! याचबरोबर पद्मशाली सखी संघमच्या ‘एकटी नव्हे, आम्ही सर्व सखी’ ! हे ब्रीदवाक्य आणि लोगो’चे अनावरण पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष, सोलापूरचे माजी महापौर महेश अण्णा कोठे यांच्या हस्ते नुकतेच थाटात करण्यात आले आहे.
सोलापूरातील दाजी पेठ येथील श्रीराम मंदिर येथे नुकतेच ‘लोगो’ आणि ‘ब्रीदवाक्याचे’ अनावरण पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संघमचे अध्यक्ष महेश अण्णा कोठे यांच्या हस्ते करण्यात आले होते त्यावेळी बोलताना म्हणाले, ‘माणूस आयुष्यात किती संकटात आहे, त्यापेक्षा समाजासाठी काहीतरी देणे लागतो ही भावना ठेवणे महत्वाचे आहे, फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांनी त्यांचे आरोग्य ठीक नसतानाही समाजासाठी उपक्रम राबवणे, आज पद्मशाली समाजात महिला समाजासाठी एकत्र येणे फार आवश्यकता असून पद्मशाली सखी संघमच्या माध्यमातून एकत्र येण्यासाठी कोंडा हे धडपड करताहेत. जेणेकरुन किमान महिलांच्या कला – गुणांना वाव मिळावा म्हणून. सखी संघमच्या वतीने महिलांचे सहभागी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे समाजातील महिलांमध्ये मानसिकतेत बदल घडत आहे. तसेच माणसाने विशिष्ठ वयाच्या जन्मदिनी आणि दरवर्षी येणा-या जन्मदिनाचे औचित्य साधून समाजातील गरजूंसाठी काहीतरी करण्याचे संकल्प करावे. त्याने मिळणारा आनंद बहूमूल्य आहे’.