रा.से.यो. शिबीर कार्यकर्ता घडविण्याची कार्यशाळा -भाऊसाहेब सावंत

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
राष्ट्रीय सेवा योजना शिबीरात स्वावलंबन, शिस्त, परोपकार, सहिष्णुता, स्वच्छता ही मानवता जोपासणारी मूल्य रुजले जातात . समाजाची सेवा करण्याची प्रेरणा विद्यार्थी दशेत मिळत असल्याने राष्ट्रीय सेवा योजना शिबीर म्हणजे आदर्श नागरिक व सामाजिक कार्यकर्ता घडविण्याची कार्यशाळा आहे. असे प्रतिपादन ग्रामीण साहित्यिक तथा सरपंच भाऊसाहेब सावंत यांनी केले.चिलेखनवाडी ता. नेवासा येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व मारूतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय सेवा योजना विशेष हिवाळी शिबीर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
शिबीर कालावधित ग्रामस्वच्छता, वृक्षारोपन, कोरोना जनजागृती, माझी वसुंधरा अभियान, युवा सबलीकरण व महिला सक्षमीकरण, अक्षय ऊर्जा स्त्रोत जनजागृती, वृक्षदिंडी, व्याख्यानमाला आदी उपक्रम राबविण्यात आले.
या प्रसंगी प्राचार्य डॉ. रामकिसन सासवडे, उपप्राचार्य डॉ. संभाजी काळे,,उपसरपंच नाथा गुंजाळ, शालेय व्यवस्थापन समीती अध्यक्ष सूर्यकांत पाडळे, ग्रामसेवक कविता शिंदे, मुख्याध्यापक सुरेश सानप,डॉ. संजय मेहर, मधुकर काटे उपस्थित होत.
शिबीरात डॉ. शिरिष लांडगे, उद्योजक बी.डी. पुरी, डॉ. संजय मेहर, डॉ. संजय दरवडे, डॉ. रमेश नवल यांनी विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले.शिबीर समारोप प्रसंगी संस्थेचे विश्वस्त डॉ. नारायण म्हस्के, प्रा.विकास कसबे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रा.लतिफ शेख यांनी केले.प्रा. योगेश लबडे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन प्रा. मोहिनी साठे यांनी केले.