कु.पूजा ढगे बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कृषी विकास अधिकारी १ या पदावर

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कळस येथील कु.पूजा विश्वास ढगे हिची बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कृषी विकास अधिकारी १ या पदावर निवड झाली आहे.
कळस येथील शेतकरी कुटुंबातील असणारी जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमातून शिक्षण घेतले आहे. कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे एम टेक ऍग्री इंजिनिअरिंग चे शिक्षण घेतले असून कुठल्याही शिकवणी शिवाय हे यश संपादन केले आहे. आई गृहिणी असून वडील विश्वास ढगे हे अगस्ती साखर कारखान्यात कार्यालयीन अधीक्षक पदावर आहेत. कळस गावचे माजी सरपंच दिलीप ढगे, व माध्यमिक शिक्षक सोसायटीचे व्हा. चेअरमन अण्णासाहेब ढगे यांची पुतणी आहे. तिच्या या तिच्या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे अगस्ती साखर कारखान्याचे चेअरमन मधुकरराव पिचड, आमदार किरण लहामटे, माजी आमदार वैभवराव पिचड, व्हा. चेअरमन सिताराम पाटील गायकर, जि प सदस्य कैलासराव वाकचौरे, अहमदनगर जिल्हा माध्यमिक सोसायटी चे संचालक प्रा. भाऊसाहेब कचरे, चेअरमन सुरेश मिसाळ, अगस्ती साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अजित देशमुख यांनी तिचे अभिनंदन केले आहे.-
