खरवंडी कासार तलाठी कार्यालय पावसाची गळती आणि घाणीच्या साम्राज्यात

खरवंडी कासार :दि27 पाथर्डी तालुक्यातील खरवंडी कासार येथिल सजा तलाठी कार्यालयात पाण्याची गळती सुरु आहे या बाबत मराठा महासंघाचे पाथर्डी तालुका अध्यक्ष अंबादास जगताप यांनी तहसिलदार श्याम वाडकर यांचे लक्ष वेधले आहे
येथील तलाठी कार्यालय खरवंडी कासार सह मालेवाडी किर्तनवाडी, भारजवाडी ,भगवानगड ,लमाणतांडा ,मिडसांगवी, ढाकणवाडी, जवळवाडी, काटेवाडी, ढगेवाडी तुळजवाडी आदी गावाचा मुख्य सजा खरवंडी कासार दप्तरी कारभार येथून चालतो
या तलाठी कार्यांलय इमारतीस गळती लागली आहे लाकडी फर्निचर ओले झाले असून रॅक मधिल उघडे दप्तर ओले झाले असून अखेरची घंटका मोजत आहेत सजा इमारतीस मागिल बाजूस खिडकी लाईन घाणीचे साम्राज्य पसरले आहे सजा इमारतीस दुतर्फा पाणी गळती लागली आहे सजाचे तलाठी जालिंदर सांगळे यांनी तात्पुरती ताडपत्री अच्छादन केले असून वाऱ्याच्या दाबाने गळती थांबत नाही तलाठी सजा इमारत परिसर घाणी साम्राज्याकडे जाणिव पुर्वक दुर्लंक्ष होत आहे आधिच जिर्ण झालेले सजाचे दप्तर आणि त्याच दप्तरावर मोठे संकट आल्याने लाख मोलाचे दप्तर धोक्यात आले आहे योग्य वेळी दखल न घेतल्यास द्वितीय प्रतिसाठी तलाठी कार्यांलय परिसरातील खरवंडी सह परिसरातील शेतकर्याना पाथर्डी येथे हेलपाटे मारावे लागतील आपल्या पातळीवर तात्काळ निर्णय घ्यावा
जिर्णं दप्तर नविन अद्यावत करावे सजा ईमारती शेजारील घाणीच साम्राज्य विषयी संबधीत अधिकारी यांना सुचना कराव्यात घाणिचे साम्राज्य न काढल्यास खरवंडी कासार ग्रामपंचायतला ताळ ठोकणार असे मत मराठा महासंघ पाथर्डी तालुका अध्यक्ष अंबादास जगताप यांनी निवेदनाद्वारे पाथर्डी तहसिलदार श्याम वाडकर यांचेकडे केली आहे