दारूबंदी असणाऱ्या राजूर गावात अवैध दारू विकताना एकाला पकडले

राजूर प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील राजूर येथें दारुबंदी असताना गावात अवैध दारू विकताना एक जण आढळून आल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे
राजुर गावात ग्रामपंचायतच्या मागे येथे राजेद्र यशवंत भराडे हा अवैध देशी दारुची विक्री करत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राजुर पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला या
ठिकाणी एक इसम अवैध रित्या दारु विक्री करताना दिसला असता त्यास पकडुन त्याची झडती घेतली त्याच्याकडे
. संत्रा कंपनीची देशी दारु 180 मि.ली.च्या 87 सिलबंद बाटल्या,प्रत्येकी किंमत 60/-रु. असा 5220 रुपये किमतीचा माल आढळून आला
यातील आरोपी राजेद्र यशवंत भराडे,वय-46 वर्षे, रा. देवठाण, ता. अकोले यास ताब्यात घेतले आहे. पो कॉ फटांगरे यांचे फिर्यादीवरुन राजुर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 11/2022 मुंबई प्रोव्हीशन अँक्ट 65(ई)प्रमाणे गुन्हा दाखल झाला असुन पुढील तपास पो ना डी. के. भडकवाड हे करत आहेत.पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली
======================================
