सामाजिक

सर्वोदय विदया मंदिरात महात्मा गांधी व लाल बहादुर शास्त्री यांना अभिवादन.

अकोले /प्रतिनिधी
अन्यायाशिवाय क्रांती होत नाही.या क्रांती मधूनच राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच लाल बहादुर शास्त्री जन्माले आले.सर्व मार्ग संपतात . महात्मा गांधी योग्य मार्ग दाखविणारे राष्ट्रपिता होते.महात्मा गांधी व्यक्ती नाही तर एक विचार होते.असे प्रतिपादन प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी केले.
गुरुवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विदया मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालय राजुर येथे महात्मा गांधी तसेच लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी प्राचार्य श्री.बनकर विचारमंच्यावरून बोलत होते.
यावेळी संस्थेचे संचालक विजय पवार, विदयालयाचे उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,वसतीगृहाचे कर्मचारी तसेच विदयार्थी उपस्थित होते.
प्राचार्य भाऊसाहेब बनकर यांनी पुढे बोलताना आपण भाग्यशाली समजले पाहीजे, सत्यनिकेतन संस्थेचा संबंध थेट महात्मा गांधींजींशी आला. ही विचारधारा बापुसाहेब शेंडे,सावित्रिबाई मदन,रा.वि.पाटणकर यांनी सत्यनिकेतन परिवारात कायम ठेवली.खेड्याकडे चला हा संदेश देत दिनदलित,उपेक्षित,शेतकरी,शिक्षक यांचे ते मार्गदर्शक ठरले.म्हणूनच आजही या विचार आचारांची गरज असल्याचे विचार प्रतिपादित केले.


दिपक पाचपुते यांनी,महात्मा गांधींचे नाव घेतल्याशिवाय कोणतेच कार्य पूर्ण होत नाही.गांधीजींचे विचार संपूर्ण जगाला कळाले.त्यासाठी गांधींजीचे चरित्र वाचले पाहीजे.त्यांचे विचार शाश्वत व सर्वव्यापी आहेत.गांधीवाद एक जीवन प्रणाली एका युगाचा चेहरा आहे.सर्वजन शांततेचा मार्ग शोधत आहेत,अशावेळी महात्मा गांधी यांचे विचार आवश्यक आहेत. त्यांच्या विचारात मानवतावाद दिसतो.गांधीजींचे विचार फक्त पुस्तकात राहीले.ते नवीन पिढीला कळाले पाहीजे.सत्यनिकेत,सर्वोदय ही नावे दिशादर्शक आहेत.आपल्यात महात्मा गांधी, लाल बहादूर शास्त्री, रा.वि.पाटणकर, बापुसाहेब शेंडे, सावित्रिबाई मदन पाहू तेव्हाच आपले स्वप्न पुर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला.
बिना सावंत यांनी, जे सत्याच्या मार्गावर चालतात,त्यांची पावले नेहमीच मजबुत असतात.त्यासाठी गांधीजींचे मूल्य शिक्षण समजुन घेऊ. गांधीजींमुळे आपण घडलो.त्यांचे सत्य,अहिंसा, प्रेम, सदाचार या तत्त्वांचा अंगिकार करा असे मत व्यक्त केले.
प्रा.संतराम बारवकर व प्रा.बाळासाहेब घिगे, पुंजिराम पवार यांनी सुरबद्ध सर्वधर्म प्रार्थना गायनातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
श्रीकांत घाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button