पिंपळगाव नाकविंदा येथे श्री महालक्ष्मी माता नवरात्रोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न.

अकोले/प्रतिनिधी–
अकोले तालुक्यातील पिंपळगाव नाकविंदा येथे श्री विठ्ठल मंदिर देवस्थान ट्रस्ट यायोजित श्रीक्षेत्र महालक्ष्मी मंदिर येथे श्री महालक्ष्मी माता नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात अतिशय जल्लोषात संपन्न झाला.या वेळी काकडा,आरती, पारायण,हरिपाठ,कीर्तन,महाप्रसाद
आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या वेळी ह.भ.प.संदीप महाराज सावंत,ह.भ.प.दौलत महाराज शेटे,ह.भ.प.नितीन महाराज देशमुख, ह.भ.प.भाविकाताई पवार,ह.भ.प.दीपक महाराज देशमुख,ह.भ.प.वेंकटेश सोनवणे, ह.भ.प.ज्ञानेश्वरीताई निमसे, ह.भ.प. अमोल महाराज भोत,ह.प.भ.इंद्रजित महाराज रसाळ आदी कीर्तने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे होते.दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन व भव्य मिरवणूक सोहळा संपन्न झाला.नवरात्र उत्सव संपन्नतेसाठी समस्त ग्रामस्थ,महिला भगिनी,भजनी मंडळ,विशेषतः तरुण मित्र मंडळाने विशेष परिश्रम घेतले.नवरात्रोत्सवा निमित्त तालुक्याचे आमदार डॉ.किरणजी लहामटे,माजी उपसभापती मारूती मेंगाळ आदींनी सदिच्छा भेट दिली.
यावेळी आमदार डॉ.किरण लहामटे यांनी आपले विचार व्यक्त करताना महालक्ष्मी मातेच्या कृपेने गावाने मला भरभरून आर्शिवाद दिले.त्याचे ऋण म्हणून अनेक विकास कामे करण्याची संधी मला मिळाली.आजुनही मला भरपुर काही दयायचे आहे.ज्या दिवशी गावात गुटखा,दारू बंदी होईल सर्व गाव व्यासनापासून मुक्त होईल.असा ठराव ग्रामपंचायतीने दिल्यास खुप काही विकासकामे आपल्या गावात देण्यास मि बांधील राहील असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले.