मोळी विका पण, मुलांनो शाळा शिका” चा मंत्र देणाऱ्या आदर्श माता : बुधाबाई भोजने

मोळी विका पण, मुलांनो शाळा शिका” असा मन्त्र देणाऱ्या आदर्श माता : बुधाबाई भोजने
सुनील गिते
अकोले वारकरी संप्रदायातील व आदिवासी समाजातील आदर्शमाता बुधाबाई नामदेव भोजने यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले
अकोले तालुक्यातील भोजनेवाडी (अबीतखिंड) येथील रहिवाशी, कष्टकरी कुटुंबातील बुधाबाई भोजने यांचे दिनांक 19 जानेवारी 2022 रोजी भोजनेवाडी येथे निधन झाले त्यांच्या पाठीमागे मुलगा,-सून, एक नातू,, दोन नाती असा परिवार आहे रामनाथ भोजने हा एकुलता एक मुलगा असून रामनाथ भोजने यांचे समाजकार्यात मोठे योगदान आहे बुधाबाई भोजनें या वारकरी संप्रदायातील भक्ती मार्गातील असल्याकारणाने गोरगरीब मुलांना सांभाळणे, मोलमजुरी करून लोकांना मदत करणे गरीब मुलांना शिक्षणासाठी मदत करणे असा त्यांचा स्वभाव, अशिक्षित असतानाही मुलांच्या शिक्षणासाठी त्यांची सतत मदतीची भावना होती ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्यावर होता यामुळेच बुधाबाई भोजने यांनी मुलांच्या शिक्षणासाठी भोजनेवाडी येथे अनाथालय सुरू करण्यास सल्ला दिला
सन 2016 साली मुलगा रामनाथ भोजने यांनी। भोजनेवाडीत अनाथालय या संस्थेची निर्मिती केली आजही या ठिकाणी श्री रामनाथ भोजने ग्रामस्थ ग्रामस्थ व मित्र मंडळाच्या माध्यमातून स्वखर्चाने अनाथालय चालवत आहे

आंभोळ तालुका अकोले येथील बाळू खोकले भीमाबाई खोकले यांच्या घराण्यात बुधाबाई भोजने यांचा 1938 साली बुधाबाई भोजने यांचा जन्म झाला अशिक्षित घराण्याचा वारसा असला तरी सुशिक्षित असल्याचा स्वभाव त्यांना लाभला अशिक्षितपणाचा त्यांच्यात कधीही लवलेश जाणवला नाही त्यांच्या विचारांचा वारसा मुलगा रामनाथ यांनी सामाजिक शैक्षणिक व राजकीय कामातून सुरू ठेवला ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या विचारांचा प्रभाव आणि पगडा त्यांचा वर होता म्हणूनच त्यांनी आपल्या आदिवासी गोरगरीब मुलाना सतत शिक्षणाच्या कामासाठी मदत केली आदिवासी गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणाच्या अडचण दूर करण्यासाठी प्रेरणा दिली या त्यांच्या विचारांचा गौरव 2011 साली करण्यात आला मातोश्री बुधाबाई भोजने यांना मुंबई येथे” ” सह्याद्री भूषण आदर्श आई” हा पुरस्कार देऊन गौरविले राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त पोलीस आयुक्त कोंडीराम पोपेरे ,पोलीस निरीक्षक डी एम भांडकोळी ,मंत्रालयातील नियोजन अधिकारी रमेश परचाके विक्रीकर आयुक्त नागपूर शशिकांत नागभीडकर यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आला
आईच्या विचाराचा वारसा मुलगा रामनाथ भोजने यांनी सुरू ठेवला आहे
गावातच मुलांची शिक्षणाची सोय उपलब्ध होईल म्हणून जिल्हा परिषद शाळेसाठी त्यांनी स्वतःची पाच गुंठे जमीन दान केली,, अनाथालय सुरू केले ,भविष्यामध्ये या ठिकाणी अनाथ मुलांच्या निवासासाठी तसेच स्मृती भवनाचे बांधकाम करण्याचा त्यांचा मानस आहे बुधाबाई चा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी हा संकल्प असल्याचे रामनाथ भोजने म्हणतात
“लाकडाची मोळी विका पण मुलांनो शाळा शिका” हा संदेश देणाऱ्या बुधाबाई भोजने या अतिशय कष्टमय जीवन जगल्या 1972 च्या दुष्काळात रोजगार हमीवर त्यांनी काम केले कुटुंबाचे समाजाचे दुःख पाहिजे पोटाला चिमटा देऊन प्रपंचाचा गाडा सुरू ठेवला ,गवताची भारी आणि लाकडाची मोळी विकून त्यांनी आपला प्रपंच सुरू ठेवला या तोडक्या-मोडक्या प्रपंचातून त्यांनी समाजासाठी तळमळ सुरुं ठेवली पतीचे छत्र हरपले नंतर देखील त्यांनी न डगमगता धीराने आपले काम सुरू ठेवले त्यावेळी एकुलत्या एका लहान मुलाला त्यानी शिक्षणाची कोणतीही उणीव भासू दिली नाही कोणतीही आर्थिक अडचण भासू दिली नाही मुलाला पदवीपर्यंतचे शिक्षण देण्यासाठी तिने सतत धडपड ठेवली गवताची भारी आणि लाकडाच्या मोळ्या विकून त्यांनी आपल्या मुलांना शिक्षण दिले
मोळी विका पण मुलांनो शाळा शिका असा संदेश देणाऱ्या या मातेने नेहमीच आदिवासींच्या मुलांच्या शिक्षणासाठी सामाजिक धार्मिक, विचारांचा वारसा जपला या मातेचे 19 जानेवारीला 2022 वयाच्या 85 वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले तिच्या जाण्याने परिसराची व आदिवासी समाजातील आदर्श आईची एक सामाजिक पोकळी निर्माण झाली आहे समाजाची एक पोकळी निर्माण झाली आहे या मातेला विनम्र अभिवादनआदिवासी अखिल भारतीय आदिवासी परिषदेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष मधुकरराव पिचड,राष्ट्रीय अध्यक्ष आदिवासी विकास परिषदेचे अध्यक्ष सोमजीभाई दामोर आमदार डॉक्टर किरण लहामटे, ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे ,लिज्जत पापडचे कार्यकारी अधिकारी सुरेशराव कोते, पिंपरी चिंचवडच्या महापौर शकुंतला धराडे , इगतपुरी चे माजी आमदार शिवराम झोले जुन्नर चे माजी आमदार बाळासाहेब दांगट, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे, जुन्नरचे देवराव मुंडे आदींनी दुःख व्यक्त केले आहे
