इतर
शेख जानीभाई बोल्डेकर यांचे निधन

कळमनुरी – बोल्डा ता. कळमनुरी येथील सामाजिक कार्यकर्ते शेख जानी शेख नबीसाहाब (वय ७५ ) यांचे २५ आक्टोबर रोजी हृद्यविकाराने निधन झाले.
सामाजिक,राजकीय तसेच शैक्षणीक क्षेत्रात उल्लेखनीय काम केले . नेहमी गावाच्या विकासासाठी धडपड करणारा नेता ,निर्भीडपणे अधिकारी,राजकीय नेत्यासमोर गावाचे प्रश्न मांडणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती.
त्यांच्या पश्चात पत्नी , ३ मुले , सुना , नातवंडे असा परिवार आहे. ते सुप्रसिध्द मुस्लिम मराठी साहित्यिक शेख शफी बोल्डेकर , शिक्षक शेख निसार , शेख लतीफ यांचे ते वडील आहेत.