आजचे पंचांग व राशिभविष्य दि २९/१०/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०७ शके १९४५
दिनांक :- २९/१०/२०२३,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२९,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०५:५७,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- शरदऋतु
मास :- अश्विन
पक्ष :- कृष्षपक्ष
तिथी :- प्रतिपदा समाप्ति २३:५३,
नक्षत्र :- भरणी समाप्ति २८:४२,
योग :- सिद्धि समाप्ति २०:००,
करण :- बालव समाप्ति १२:५०,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- तुला – स्वाती,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- करिदिन वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- संध्या. ०४:३१ ते ०५:५७ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२१ ते १०:४७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी २०:४७ ते १२:१३ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:३९ ते ०३:०५ पर्यंत,
❀ दिन विशेष:
इष्टि, ग्रहण करिदिन,
————–
:
🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- कार्तिक ०७ शके १९४५
दिनांक = २९/१०/२०२३
वार = भानुवासरे(रविवार)
मेष
तडकाफडकी निर्णय बदलू नका. कर्जाचे व्यवहार करू नयेत. जुन्या मित्रांशी संवाद प्रसन्नता आणेल. जनसंपर्कात भर पडेल. जोडीदाराची साथ मिळेल.
वृषभ
मुलांकडून अपेक्षा पूर्ण केल्या जातील. दिनक्रम व्यस्त राहील. धावपळ करताना सावधगिरी बाळगावी लागेल. जुनी कामे पूर्ण करता येतील. प्रवासात काळजी घ्यावी.
मिथुन
स्वप्नवत वातावरणात रमून जाल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे. जुन्या आजारांकडे लक्ष ठेवावे. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल.
कर्क
उगाच चिडचिड करू नका. एखादी गोष्ट मनाविरुद्ध घडू शकते. परिश्रमात कमी पडू नका. मनातील चुकीचा विचार बाजूला सारावा. आवडीवर खर्च कराल.
सिंह
आपल्या कर्तृत्वाला अधिक वाव मिळेल. नवीन पायाभरणी करता येईल. संमिश्र घटनांचा दिवस. मानसिक आंदोलन ओळखून वागावे. मानसिकतेचा परिणाम इतरांवर पडू देऊ नका.
कन्या
मनातील इच्छा पूर्ण होईल. आवडीच्या गोष्टी करता येतील. दिवस चांगला जाईल. व्यापरिवर्गाला चांगला लाभ मिळेल. कठीण कामे सुलभतेने पार पाडाल.
तूळ
जवळच्या व्यक्तीची भेट होईल. दिवस कामात व्यस्त राहील. घाईघाईने कोणतीही गोष्ट करू नका. बोलताना भान राखावे. आपले स्वत्व राखून वागाल.
वृश्चिक
कौटुंबिक समाधान शोधाल. आपले प्रयत्न कमी पडू देऊ नका. दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करावी. संयम बाळगून परिस्थिति हाताळावी. इतरांच्या आनंदात आनंद मानाल.
धनू
अचानक धनलाभ संभवतो. छानछोकीसाठी खर्च कराल. ज्ञानात भर पडेल. दान-धर्म कराल. आर्थिक बाजू सुधारेल.
मकर
जुनी येणी वसूल होतील. पत्नीशी वाद घालू नका. गैरसमजाला मनात थारा देऊ नका. भागीदाराची बाजू विचारात घ्या. अनावश्यक खर्च संभवतो.
कुंभ
जोडीदाराला खुश करावे लागेल. खर्च मर्यादित ठेवावा. फसवणुकीपासून सावध राहावे. लहान प्रवास संभवतो. घरातील ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा.
मीन
व्यवसायात प्रगती करता येईल. सामाजिक मान वाढेल. कामात चांगला उत्साह जाणवेल. जोडीदाराची इच्छा पूर्ण कराल. मुलांशी मतभेद संभवतात.
🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर