पुण्यात कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत काव्यसंमेलन संपन्न.

पुणे-महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे ( महाराष्ट) व काव्यशिल्प पुणे या साहित्य क्षेत्रात उत्तुंग काम करीत असलेल्या संस्थाच्या संयुक्त विद्यमाने कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून मोठे काव्यसंमेलन झाले.
*या प्रसंगी पुण्यातील या दोनही *ख्यातनाम संस्थानचे अध्यक्ष , व उपाध्यक्ष सर्वश्री वि.ग.सातपुते (विगसा ) , मिलिंद सु जोशी , डॉ. महेंद्र ठाकुरदास , ज्येष्ठ कवयित्री सुजाता पवार सर्वच मान्यवर कवी आवर्जून उपस्थित होते.
28 ऑक्टोबर रोजी पुण्यतील स्कॉउट ग्राऊंडच्या सभागृहात प्रतिवर्षा प्रमाणे हा कार्यक्रम पुण्यातील विद्यमान आणि प्रतिभावंत कवी व कवयित्री यांच्या सुंदर काव्य सादरीकरणाने अत्यन्त उत्साहात संपन्न झाला.
महाकवी कालिदासचे उपाध्यक्ष डॉ. महेंद्र ठाकुरदास यांनी आपल्या ओघवत्या मनोगतात काव्यश्रेष्ठता आणि प्रचलित साहित्य संपदा याबद्दल विचार मांडले . तर काव्यशिल्पचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काव्यशिल्पच्या पुढील महिन्यात नोव्हेंम्बर 2023 मध्ये दोन दिवस होणाऱ्या कार्यक्रमाबाबत निवेदन देवून सर्वांनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन केले.

सर्व प्रतिभावंत कविवरांच्या ही काव्यकोजागिरी अत्यन्त उत्साहात साजरी झाली. अल्पोपहार दुग्धपानानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. कवयित्री सुजाता पवार सचिव काव्यशिल्प यांनी आभार मानले.