मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा ५० व्या गळीत हंगाम शुभारंभ

ज्ञानेश्वर कारखान्याच्या माध्यमातून अनेकांचे संसार सुधारले- भास्करगिरीजी महाराज
शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
सर्वांचा विकास हाच देशाचा विकास, देशाचा विकास म्हणजे देशांमध्ये राहणाऱ्या सर्व जाती-धर्मातील बांधवांचा हा विकास आहे. कारखाने-शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून आपल्याला सर्वांचे हित साधायचे आहे.
ज्ञानेश्वर साखर कारखान्याच्या माध्यमातून गेल्या पन्नास वर्षांमध्ये अनेकांचे संसार कितीतरी सुधारले आहेत, सुधारत आहेत आणि सुधारत रहातील असे प्रतिपादन श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे ५० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ बुधवार दि.०१ नोव्हेबर रोजी सकाळी ९:३० वाजता श्री क्षेत्र देवगड संस्थानचे महंत गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते पहिली ऊस मोळी टाकून करण्यात आला.
कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कारखान्याचे संचालक माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग, कामगार संघटननेचे सरचिटणीस नितिन पवार, संचालक काकासाहेब नरवडे,काकासाहेब शिंदे, अशोकराव मिसाळ, प्रा.नारायण म्हस्के,पंडित भोसले,भाऊसाहेब कांगुणे, जनार्धन कदम,शिवाजी कोलते,मच्छिद्र म्हस्के, बबनराव भुसारी,दीपक नन्नवरे,शंकरराव पावसे,विष्णू जगदाळे,दादासाहेब गंडाळ,कॉ.बाबा आरगडे, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे,सचिव रवींद्र मोटे व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी कारखान्याचे संचालक सखाराम लव्हाळे व सौ.विमलताई लव्हाळे यांचे हस्ते गव्हाण तर ऊस पुरवठा विभागाचे श्री.पंढरीनाथ टेकणे व सौ. कमलताई टेकणे यांचे हस्ते ऊस वजन काट्याची विधिवत पूजा करण्यात आली.
गुरुवर्य भास्करगिरी जी महाराज पुढे म्हणाले की,मंदिरातला देव तर आपल्याला पूजायचाच आहे पण त्याहीपेक्षा समाजाकरता जो उद्योग-कारखाना निर्माण करतो त्याला पहिल्यांदा आपण देव मानलं पाहिजे. सर्वांच्या प्रयत्नाने-विचाराने कारखाना उभा करणे, तो चालविणे आणि टिकून ठेवणे ही तारे वरची कसरत झाली आहे.स्वर्गीय मारुतराव घुले पाटील साहेबांनी अथक प्रयत्नाने कारखाना-शिक्षण संस्था उभ्या केल्या त्यामुळे परिसर सुजलाम-सुफलाम झाला.यालाच सहकारची गंगा म्हणतात. मठ-मंदिरे,धार्मिक क्षेत्र उभे करणे हे आंतरिक सुख आहे पण बाह्यसूख मिळविण्याकरिता समाजाला उपयोगी पडतील असा वास्तु-कारखाने निर्माण करणे गरजेचे आहे.सामूहिक शक्ति,नेत्यांचे धोरण आणि अध्यात्माची जोड़ या त्रिवेणी संगमातुन भौतिक सुधारणा होते,आंतरिक सुख प्राप्त होते.
यावेळी भय्यासाहेब देशमुख, तुकाराम मिसाळ,दत्तात्रय काळे, डॉ.शिवाजी शिंदे, अजित मुरकुटे, गणेश गव्हाणे,बापूसाहेब नजन,अशोक वायकर, घुले पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष बबनराव धस,सोपान महापुर, रामभाऊ पाउलबुद्धे, राजेंद्र परसय्या,डॉ.सुधाकर लांडे, भीमराज शेंडे,शिवाजी चिंधे,खंडू खंडागळे, रावसाहेब निकम, अरुण देशमुख, बाबासाहेब आगळे, साहेबराव अंधाळे, मोहनराव गलांडे, एकनाथ कसाळ, भाऊसाहेब आगळे, मिलिंद कुलकर्णी, भास्कर खेडकर, वैभव नवले, दत्तात्रय विधाटे, कृष्णा ढोरकुले, नाना मडके, अरुण खंडागळे, एकनाथ भुजबळ, तुकाराम काळे, बबनराव भानगुडे, बाळासाहेब धोंडे, बबन जगदाळे, दगडू दुकळे, आप्पासाहेब मडके, दिलीप मोटे, आबासाहेब ताकटे, रामराव भदगले,दत्तात्रय खाटीक, काकासाहेब काळे, डॉ. गुलाब नजन, डॉ. घुले, रावसाहेब खाटीक, आप्पासाहेब देशमुख, त्रिंबक जाधव,विजय कावरे,जनार्दन कदम,उत्तमराव वाबळे, मारुतराव थोरात, रवींद्र नवले, राजेंद्र पाटील, संभाजी पवार, मोहन भगत, ज्ञानदेव दहातोंडे, शेषराव दुकळे, जनार्दन शेळके, कारखान्याचे कामगार संचालक सुखदेव फुलारी, संभाजी माळवदे,संजय राऊत, अण्णासाहेब गर्जे, तांत्रिक सल्लागार एस.डी.चौधरी, एम.एस.मुरकुटे,चिफ इंजिनिअर राहुल पाटील, मुख्य शेतकी अधिकारी सुरेश आहेर,कामगार अधिकारी बाळासाहेब डोहाळे आदी उपस्थित होते.
कारखान्याचे उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्ताविक केले. भाऊसाहेब सावंत यांनी सूत्रसंचालन केले. काशिनाथ नवले यांनी आभार मानले.
कामगारांना १३ टक्के बोनस
कारखाना व्यवस्थापन व कामगार संघटना यांच्यात झालेल्या चर्चेनुसार कामगारांना १३ टक्के दिवाळी बोनस देण्याचा निर्णय झाला आहे.