भाजपा व्यापारी आघाडी राजूर शहर अध्यक्षपदी विनायक माळवे यांची निवड

विलास तुपे
राजूर प्रतिनिधी
येथील व्यापारी विनायक माळवे यांची भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडी राजूर शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आलेली आहे. तसे त्यांच्या निवडीचे पत्र भाजपाचे नवनिर्वाचित तालुका अध्यक्ष यशवंत आभाळे यांनी त्यांना दिले आहे
आज राजुर येथे माजी आमदार वैभवराव पिचड भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे तालुका अध्यक्ष यशवंत आभाळे तसेच राहुल देशमुख यांच्या उपस्थितीत विनायक माळवे यांची भाजपा व्यापारी आघाडी राजुर शहराध्यक्षपदी निवड करण्यात आली
राजुर येथील प्रतीथयश व्यापारी असलेले माळवे यांच्या निवडीने व्यापारी वर्गाने आनंद व्यक्त केला विद्यार्थी दशेपासून माळवे हे सामाजिक व राजकीय कार्यात अग्रेसर असतात त्यांच्या या कार्याची खऱ्या अर्थाने त्यांना पावती मिळाली

त्यांच्या या निवडीचे माजी मंत्री मधुकरराव पिचड माआमदार वैभवराव पिचड तालुका अध्यक्ष यशवंतराव आभाळे, जिल्हा सरचिटणीस सिताराम भांगरे गिरजाजी जाधव माजी सरपंच गणपत देशमुख उपसरपंच संतोष बनसोडे मा उपसरपंच गोकुळ कानकाटे राजुर सोसायटीचे व्हाईस चेअरमन शेखर वालझाडे विजय भांगरे शांताराम काळे नंदकिशोर चोथवे निलेश साकोरे विनायक घाटकर विलास तुपे अण्णा पाबळकर रोशन रोकडे संतोष भागवत हर्षल सोनार यांनी अभिनंदन केले