आंभोळ येथील बबनराव चौधरी यांचे कळस येथे रस्ताअपघातात निधन

कोतुळ (प्रतिनिधी)-
अमृतसागर दूध संघाचे संचालक,अंभोळ गावचे माजी सरपंच, विघ्नहर दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन बबनराव किसन चौधरी( वय- 70 ,रा.अंभोळ)यांचे कळस येथे रस्ता अपघातात निधन झाले
समोरून येणाऱ्या मोटारसायकलने धडक दिल्याने शनिवारी दुपारी अपघाती निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली ,सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
मुबंई येथे खासगी कंपनीत काम पाहणारे राजेश,औरंगाबाद येथे कंपनीत असणारे संजय चौधरी यांचे ते वडील होत.औरंगाबाद येथील पी एस आय शुभांगी ढगे-चौधरी यांचे ते सासरे होत.
त्यांच्यावर आज रविवारी सकाळी अंभोळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी माजी आमदार व अमृत सागर दूध संघाचे चेअरमन वैभवराव पिचड यांचेसह सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्र परिवार,नातेवाईक ग्रामस्थ मोठ्या संख्यने उपस्थित होते.
त्यांच्या अपघाती निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.