ग्रामीणमहाराष्ट्र

भंडारदरा पर्यटन पंढरीत बी एस एन एल या नेटवर्क सेवेचा बोजवारा !

संजय महानोर

भंडारदरा / प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील भंडारदरा या पर्यटन पंढरीमध्ये बी एस एन एल या नेटवर्किंगच्या सेवेचा बोजवारा उडाला असुन पर्यटनासाठी बी एस एन एल ची सेवा एक प्रकारे शाप की वरदान असा प्रश्न पर्यटनावर आधारित असणा-या व्यवसाय बंधुंना पडला आहे .
अकोले तालुक्यातील भंडारदरा म्हणजे पर्यटनाचे प्रमुख आकर्षण केंद्र असुन या पर्यटनावर स्थानिक बांधवांना चांगल्या प्रकारे रोजगार निर्मीती होऊ लागली आहे .त्यातच भंडारद-याला आता बाराही महिने पर्यटक भेट देऊ लागले आहेत .भंडारदरा परीसरात महाराष्ट्रातील एवरेस्ट कळसुबाई , आशिया खंडातील सर्वात खोल दरी म्हणजे सांदण दरी , ब्रिटीश कालीन भंडारदरा धरण , शिवाजी महाराजांचे आवडते ठिकाण म्हणून प्रसिद्ध असणारा रतनगड तर भाविकांचे श्रद्धास्थान असणारे अमृतेश्वराचे देवालय ही पर्यटकांची आवडती ठिकाणे असुन वन्यजीव विभागाच्या अभयारण्यात कापडी तंबुचा व्यवसाय हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे .पंरतु हा व्यवसाय भंडारदरा धरणाच्या पाणवठ्याजवळ , सांदणदरी परीसरात , कळसुबाई च्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणात चालत असतो . त्यासाठी आदिवासी तरुण व्यवसायिक बंधुनी खर्च करुन वेबसाईट खोलत आपल्या टेंट व्यवसायाची जाहिरात मोठ्या प्रमाणात केलेली असल्याने याची बुकींग सुद्धा वेबसाईट वरुनच होत असते .भंडारदरा परीसरातील संपुर्ण परीसरात बी एस एन एल ची सेवा चांगल्या प्रकारे कार्यरत आहे .पंरतु गत सहा ते सात महिण्यापासुन या सेवेचा या परीसरात बोजवारा उडाला असुन महिण्यातील पंधरा दिवस सुद्धा सेवा सुरळीत देण्यात बी एस एन एल कंपनी कमी पडत आहे .त्यामुळे बी एस एन एल चे ” एक महिण्याचे रिचार्ज मारा व पंधरा दिवस सेवा मिळवा ” ही नविन स्किम तर या कंपनीने राबविली नाही ना ? हा प्रश्न स्थानिकांना पडला आहे .नेटवर्किंगमध्ये सातत्य नसल्याने टेंट व्यवसायाच्या , हाॅटेल बुकींगच्या समस्येत वाढ झाली असुन बुकींग करण्यात अडचणी निर्माण होत आहेत .झालेली बुकींग केवळ संपर्क तुटल्यामुळे कॅन्सल होत असुन त्यामुळे आदिवासी तरुण व्यवसायिकाच्या रोजगारावरच संकट ओढावले आहे .त्यामुळे ही बि एस एन एल सेवा एक प्रकारे भंडारदरा पर्यटनासाठी शापच ठरत आहे .
भंडारदरा धरणाच्या रिंगरोडवर ९ गावांच्या वस्त्या असुन कोरोना या विषाणुजन्य रोगाचा प्रसार रोखण्यासाठी गत दोन वर्षात शासनाने वेळोवेळी शाळा बंद ठेवल्या .पंरतु विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करुन ऑनलाइन शिक्षणाची व्यवस्था शासनाने केली .भंडारदरा धरणाच्या परिसरात बी एस एन एल ची सेवा कायमच ठेंगा दाखवत असल्याने अनेकांना या ऑनलाईन शिक्षण सेवेचा फायदाच घेता आला नाही .परिणामतः अनेक विद्यार्थ्यांना नापासाच्या पंक्तीत नाईलाजास्तव बसावे लागले . आदिवासी भाग असला तरी आपल्या पोरानेही दोन चार धडे गिरवावे ही भंडारद-याच्या ग्रामिण भागातील खेडुताची अपेक्षा असताना पोटाला चिमटा घेत मोबाईल घेतला पण नेटवर्कने दांडी मारल्याने त्या मोबाईल चा काही फायदाच होताना दिसत नाही . एक प्रकारे बी एस एन एल आदिवासी बांधवांची रिचार्जच्या स्वरुपात घोर फसवणूक करत असल्याने बी एस एन एल ची सेवा आदिवासी बांधवासाठी एक प्रकारे शापच ठरत आहे . जमाना विज्ञानाच्या युगात वावरत असताना भंडारद-याच्या रिंगरोडवरील बांधव मात्र नेटवर्किंग मुळे मागेच पडत असल्याचे दिसुन येत असुन आता तरी बी एस एन एलला जाग येईल का प्रश्न भोळा भाबडा आदिवासी युवक करीत आहे .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button