राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धेत ज्ञानेश्वरी झिरपे द्वितीय

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
कै. बाळासाहेब भारदे राज्यस्तरीय आंतरशालेय वकृत्व स्पर्धेमध्ये आबासाहेब काकडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. ज्ञानेश्वरी महारुद्र झिरपे हीने उज्वल यशाची परंपरा कायम राखत द्वितीय क्रमांक पटकावला.
तिला प्रा रमेश भारदे श्री श्यामसुंदर भारदे तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षीस प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धक सहभागी झाले होते.
ज्ञानेश्वरीच्या या यशाबद्दल एफ.डी.एल. संस्थेचे अध्यक्ष ॲड.डॉ. विद्याधरजी काकडे साहेब, जि.प. सदस्या सौ. हर्षदाताई काकडे विश्वस्त पृथ्वीसिंहभैया काकडे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मणराव बिटाळ,विद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य संपतराव दसपुते,उपमुख्याध्यापिका सौ. मंदाकिनी भालसिंग,पर्यवेक्षिका पुष्पलता गरुड, पर्यवेक्षक सुनील आव्हाड ,सर्व शिक्षक-शिक्षिका व पालक बंधू-भगिनींनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. ज्ञानेश्वरीला प्राचार्य संपतराव दसपुते, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर गरड, भाग्यश्री गडाख ,योगेश तायडे, ज्ञानेश्वर शेळके, शीला धिंदळे, पंढरीनाथ पल्हारे,सहदेव साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. ज्ञानेश्वरी ही शहरटाकळी विद्यालयाच्या शिक्षिका श्रीम. अनिता झिरपे व डॉ.महारुद्र झिरपे यांची कन्या आहे.