नाशिककरां साठी आता दर रविवारी सेंद्रिय फळे, भाजीपाला, धान्य बाजार!

,
नाशिक : येथील रोटरी क्लब ऑफ नाशिक व शतायुषी जेष्ठ नागरिक संघ च्या पुढाकाराने नाशिक शहरात राजीव नगर, इंदिरा नगर नाशिक दर रविवारी सेंद्रिय फळे, भाजीपाला, धान्य बाजार सुरू होणार आहे
दुपारी 4 ते6 या कालावधीत हा सेंद्रिय फळे, भाजीपाला व धान्य बाजार सुरू राहील
या बाजाराचे उद्घाटन रविवार २६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४.३० वाजता नाशिक महानगरपालिका सभागृह नेता .सतीश बापू सोनवणे यांच्या हस्ते व शतायुषी जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री विजय भावे यांच्या उपस्थीतीत होणार आहे .
या बाजारामुळे नाशिककरांना रसायनविरहित भाजीपाला,फळे आणि धान्य मिळणार आहेत. हा शेतमाल पेठ, चांदवड, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी येथील शेतकरी समूहाच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आलेला असून, हा बाजार सर्व नाशिककरांसाठी खुला राहणार आहे.
छोट्या शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून उत्पादित केलेला मालाला बाजारपेठ व योग्य मोबदला व योग्य ग्राहकापर्यंत यावेळी उपलब्ध करून दिला जाणार आहे. ग्रामीण शेतकरी महिला बचत गटांनी तयार केलेली घरगुती पद्धतीची पापड, कुरडाइ, शेवया , मसाले , सुकविलेल्या भ्याज्या, गुळ , पंचगव्य उत्पादने (गिर गायीच्या शेण,गोमुत्र, दुध,तूप ,दही )पासून बनविलेले दंतमंजन ,हर्डेचुर्ण,शाम्पू ,साबण ,गोमुत्र अर्क, लाकडी घाण्याचे शेंग, खोबरे, बदाम,तील, मोहरी, करडई, सुर्यफुल खुरासणी , सुर्यफुल , एरंडतेल,हातसडी तांदूळ , सेंद्रिय गुळ, गुळ पावडर ,काकवी, वेलची, चोकलेट,तुलसी फ्लेवर गुळ, गुळाचे मोदक हि उत्पादनेदेखील या बाजारात उपलब्ध होणार आहेत .
या माध्यमातून अत्यंत दर्जेदार व प्रक्रियायुक्त शेतमाल थेट शेतकऱ्यांकडून,महिला बचत गटाकडून ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. शेतकरी व ग्राहक यांच्यातील दलालांची साखळी कमी करून यातून शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्यात व ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट करण्याचा उद्देश या माध्यमातून साद्य करण्याचा प्रयत्न रोटरी क्लब ऑफ नासिक करणार आहे.
यामुळे नाशिककरांना देखील आपले आरोग्य निरोगी ठेवण्याच्या दृष्टिने हा बाजार फलदायी ठरणार आहे. या बाजार महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रोटे .मंगेश अपशंकर , सचिव रोटे .गौरव सामनेरकर , प्रकल्प रोटे .सचिव हेमराज राजपूत , कम्युनिटी संचालक रोटे . उन्मेशदेशमुख , चेअरमन रोटे . संदीप नेरकर यानी केले आहे.