इतर

काव्योत्सव, काव्यगीता आणि प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन.

पुणे दि 26

काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे व साईश इन्फोटेक या संस्थेच्या वतीने काव्यानंदच्या सातव्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही संस्थानच्या संयुक्त विद्यमाने काव्योत्सव या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे, लेखिका वंदना ताम्हाणे लिखित काव्यगीता या ग्रंथाचे आणि लेखिका संगीता काळभोर लिखित प्रेमांकुर बहरतांना या पुस्तकांचे प्रकाशन शनिवार दिनांक २५ नोव्हेंबर २०२३ रोजी निगडी पुणे येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झाले.


या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ साहित्यिक , भावकवी व्याख्याते व संतचित्रकार मा. श्री वि. ग. सातपुते आप्पा हे लाभले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून समरसता साहित्य परिषदेचे उपाध्यक्ष श्री अरविंद दोडे हे होते. ज्येष्ठ साहित्यिक गझलकार श्री. तुकाराम पाटील, कविवर्य सतीश रानडे , कविवर्य आणि चित्रकार श्री शिवाजी सांगळे व काव्यानंद प्रतिष्ठान, पुणेचे उपाध्यक्ष व उद्योजक वैभव मोळक या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. परेश कोळी यांनी गणेश वंदना सादर केली तर कु.भाग्या खंडेलवाल हिने गुरुवंदना सादर केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक काव्यानंद प्रतिष्ठान, पुणे चे संस्थापक अध्यक्ष सुनिल खंडेलवाल यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सीमा गांधी यांनी केले.
याप्रसंगी सर्व मान्यवरांचा व प्रकाशित लेखिकांचा यथोचित सत्कार करण्यात आला. सर्व मान्यवरांनी वेगवेगळ्या विषयांवर आपले मनोगत व्यक्त केले.


कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बहारदार कवी संमेलन संपन्न झाले. खालील कवी आणि कवयित्री यांनी कवी संमेलनात सहभाग घेत सुंदर सुंदर कविता सादर केल्या.
स्नेहल रेडेकर, कोल्हापूर , स्मिता सराफ, इंदौर , हिमानी बागोरे,पुणे , वाणी ताकवणे, पुणे योगिता कोठेकर, पुणे, राणी दबडे, मुंबई, भाग्यश्री मोडक, वर्धा , दीपाली पवार, सांगली
, पौर्णिमा ढवळे, करमाळा , यशवंत देव, पुणे , प्रांजल चौधरी, पुणे, सविता कुंजीर, पुणे , गौरी काळे, पुणे, हेमलता शिखरे, मुंबई, सुहास घुमरे, पुणे, सीमा गांधी, पुणे, वंदना ताम्हाणे, मुंबई , संगीता काळभोर, मुंबई , पुष्पा पाटणकर, मेहकर , समीर मुल्ला, पुणे, शिवाजी सांगळे बदलापूर , भावना शिंपी,पुणे , परेश कोळी, पनवेल , शोभा जोशी, पुणे , सुभाष धाराशिवकर, पुणे , सुनीता बोडस, पुणे , तुकाराम पाटील, पुणे , सुलभा सत्तुरवार, पुणे , प्रतिमा काळे, पुणे , वि. ग सातपुते( पुणे ), सुनिल खंडेलवाल, पिंपरी चिंचवड , सोनाली धनमने, चंद्रपूर , सतीश रानडे, ठाणे
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अमोल शेळके, समीर मुल्ला, वंश खंडेलवाल आणि शंतनु सांगळे यांचे विशेष सहकार्य लाभले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button