अपंगांसाठी असणाऱ्या योजनांचा लाभ घ्या- राजेंद्र देशमुख
कोतुळ येथे जागतिक अपंग दिन साजरा
कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे जागतिक अपंग दिन साजरा करण्यात आला या दिवशी कोतुळ ग्रामपंचायत कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
अपंगांसाठी राज्य शासनाच्या अनेक कल्याणकारी योजना असून या योजनांचा अपंगांनी लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा जिल्हा चिटणीस राजेंद्र पाटील देशमुख यांनी यावेळी केले अपंगांनी आपल्या मनातील न्यूनगंड बाजूला सारून उद्योग व्यवसायात आप आपली कार्य क्षमता दाखवून द्यावी असेही त्यांनी सांगितले
शासकीय कार्यालयात होणारी अपंगांची हेळसांड सहन केली जाणार नाही असे प्रकारचे संघटनेचे तालुकाध्यक्ष संजय डोंगरे यांनी सांगितले
यावेळी कोतुळ ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर लोहकरे ,उपसरपंच संजय पांडुरंग देशमुख ,भाजपाचे जिल्हा चिटणीस राजू पाटील देशमुख,प्रहार अपंग संघटनेचे संजय डोंगरे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते
याप्रसंगी राजेंद्र पाटील देशमुख ,सरपंच संजय भास्कर लोकरे संजय देशमुख संजय डोंगरे ,पत्रकार सुनील गीते आदींनी मनोगत व्यक्त केले
कोतूळ ग्रामपंचायत च्या वतीने दरवर्षी अपंगां साठी पाच टक्के निधी तुन खर्च केला जातो यापुढे दरवर्षी जागतिक अपंग दिनी (3 डीसेम्बर ला ) दरवर्षी कार्यक्रम घेऊन ग्रामपंचायतचा 5% निधीचे वाटप अपंगांना केले जाईल असे यावेळी सरपंच भास्कर लोहकरे व उपसरपंच संजय देशमुख यांनी यावेळी जाहीर केले
प्रहार अपंग क्रांती संघटना मुळा विभाग चे वतीने या या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादाभाऊ गिते किशोर खरात,चित्रा साळवे, कैलास नेवासकर ,भाऊसाहेब साबळे, सुनिल शेळके ,अनिता चव्हाण संकेत देशमुख, सुमन मुठे, भिमराज भुजवळ, संजय साळवे, सिताबाई पारधी, इरफान पठाण, महेश नेवासकर, कादर सुभान शेख, किशोर नेवासकर, तबरेज काजी, सोमनाथ बेंबळे, केतकी परशुरामी आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते
प्रा किशोर खरात यांनी यावेळी आभार मानले