लिंगेश्वर हायस्कुल व मधुकरराव पिचड विद्यालय स्मृतिचषकाचे मानकरी.

.
तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धां राजूर येथे संपन्न
अकोले/प्रतिनिधी–
सत्यनिकेतन संस्थेच्या संस्थापक कोषाध्यक्षा कै.सावित्रीबाई मदन यांनी आदिवासी समाजाच्या शैक्षणिक,सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे उचित स्मरण व्हावे म्हणून त्यांच्या नावाने आंतरविद्यालयीन तालुकास्तरीय मॅरेथॉन स्पर्धां नुकत्याच राजूर येथे संपन्न झाल्या.
यामध्ये मुलांमध्ये श्री.लिंगेश्वर हायस्कुल लिंगदेव तर मुलींमध्ये मा.मधुकरराव पिचड विदयालय पाडोशी हे स्मृतिचषकाचे मानकरी ठरले.
या स्पर्धांचे उद्घाटन सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे यांचे हस्ते करण्यात आले.तसेच बक्षिस वितरण सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी सत्यनिकेतन संस्थेचे संचालक तथा लायन्स क्लबचे प्रांतीय सचिव अशोक मिस्त्री,गंगाराम करवर,विजय पवार,विलास पाबळकर,व्यवस्थापक प्रकाश महाले,माजी प्राचार्य लहानु पर्बत,बादशहा ताजणे,उपप्राचार्य अण्णासाहेब धतुरे,पर्यवेक्षक सदाशिव गिरी,क्रीडा प्रमुख जालिंदर आरोटे,विनोद तारू, संपत धुमाळ यांसह तालुक्यातील क्रीडा शिक्षक,विदयार्थी उपस्थित होते.
स्पर्धासाठी सर्वोदय विदयालय राजूर ते जामगाव असे तिन कि.मी. अंतर होते.
मुलांमध्ये भोजने वैष्णव सखाराम(लिंगदेव) प्रथम, भांगरे समिर विष्णू(मवेशी)द्वितीय, डगळे मंथन तुकाराम(सर्वोदय खिरविरे)तृतिय, पोटे ओंकार पंढरीनाथ( सर्वोदय खिरविरे)चतुर्थ व धादवड ओंकार विलास(सर्वोदय राजूर)याने पाचवा क्रमांक मिळविला.

मुलींमध्ये नाडेकर प्रतिक्षा आनंदा(पाडोशी) प्रथम, आवारी पुजा भाऊसाहेब(सर्वोदय खिरविरे) द्वितीय, दिघे भारती मारूती(सर्वोदय राजूर) तृतीय, जाधव श्रेया सतिश(लिंगदेव)चतुर्थ व साबळे जयश्री कैलास(पाडोशी) हिने पाचवा क्रमांक मिळविला.
प्रथम क्रमांकास १५०१रू.सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र व फिरता स्मृतीचषक,द्वितीय क्रमांकास १००१रु.सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र व तृतीय क्रमांकास ७०१रू.सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र असे बक्षिसाचे स्वरूप आहे.
उद्घाटन प्रसंगी सपोनि प्रविण दातरे यांनी खेळामध्ये शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास होतो.निरोगी राहण्यासाठी खेळ हाच एकमेव पर्याय आहे.ताणतणाव व्यवस्थापन होते.शिस्त सहभागाची भावना वाढते त्यामुळे खेळ महत्त्वाचा असल्याचे विचार व्यक्त केले.
संचालक अशोक मिस्त्रि यांनी निरोगी व्यक्ती हे निरोगी समाज घडवतात. प्रत्येकाने शक्य तितके मैदानी खेळ खेळले पाहीजेत.सर्वांगीन विकासासाठी खेळ महत्त्वाचे असल्याचे विचार व्यक्त केले.
बक्षिस वितरण प्रसंगि सहाय्यक प्रकल्प अधिकारी मनोजकुमार पैठणकर यांनी बक्षिसे हे चांगले वर्तन आणि स्पर्धात्मक भावनेला प्रोत्साहन देण्याचा एक मार्ग आहे.त्यासाठी सतत प्रयत्न करा.सतत प्रयत्न केल्याने यश निश्चित मिळते.ध्येयाच्या उद्धिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल उच्चीत ठरते असे विचार व्यक्त केले.
सर्धा संपन्न करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी,रूग्नवाहिका यांचे सहकार्य लाभले.तसेच विद्यालयाचे एनसीसीचे विदयार्थी यांनी ठिकठिकाणी पाणी व्यवस्था करून आपले काम नियोजनबद्ध पार पाडले.
उद्घाटनप्रसंगी प्रा.सचिन लगड तर बक्षिस वितरण प्रसंगि प्रा.संतराम बारवकर यांनी सुत्रसंचलन केले.
संचालक विजय पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.