भारतमातेचे ऋण कधीही फेडता येणार नाहीत -डि. डि. गवारे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आपल्या धर्मग्रंथाच्या बळावर विज्ञानाच्या माध्यमातुन आपला देश स्वयंपुर्णतेच्या दिशेने वाटचाल करतो आहोत. स्वातंत्र्य पुर्व काळात जगभरातुन अन्नधान्यांची आयात करावी लागत होती स्वातंत्र्य नंतरच्या काळात शेती आणि विज्ञानामध्ये प्रगती करुन आपण अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपुर्ण झालेलो आहोत. विज्ञानाच्या बाबतही आपले पाऊल सर्वाच्या पुढे आहे. चांद्रयान आणि मंगळयान मोहिमा आपण यथस्वीरित्या राबवलेल्या आहेत. त्यामूळे भारतमातेचे ऋण आपण कधीही फेडू शकत नाही. असे मत माजी अप्पर पोलीस अधीक्षक ज्ञानदेव गवारे यांनी मांडले.
शेवगाव तालुक्यातील शहरटाकळी येथे शहरटाकळी माध्य व उच्च माध्यमिक विद्यालय शहरटाकळी येथे प्रजासत्ताक दिन मोठया उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिल मडके, ग्रामीण पत्रकार संघाचे शहाराम आगळे, रविंद्र मडके, शहरटाकळीच्या सरपंच अलकाबाई शिंदे, विद्यालयाचे प्राचार्य संपतराव दसपुते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
यावेळी बोलताना गवारे म्हणाले कि, देशामध्ये प्रगतीचे वारे वाहत आहे, कलम ३७० हटवून देश अखंडतेकडे नेण्यासाठी राजकारणी चांगल्या पध्दतीचे काम करत आहे.कोविडसारख्या महाकाय संकटाशी सामाना करण्यासाठी लसीकरणाच्या बाबतीत आपला देश उदिष्ट गाठण्याकडे आगेकुच करत आहे. शिक्षणक्षेत्रातील भविष्याचा वेध घेऊन आबासाहेब काकडे यांनी ग्रामीण भागात सुरू केलेला ज्ञानरुपी यज्ञ आता प्रकाशमान होत आहे.विदयालयाचे आनेक विदयार्थी -विदयार्थीनी उच्च पदावर काम करत आहेत. ग्रामीण जीवनमानातील आबासाहेब काकडे यांनी पहिलेले स्वप्न पुर्ण होताना दिसत आहे.
यावेळी वैभव महाराज माळवदे, बाळासाहेब खराडे, दिलीप राजळे, माजी सरपंच भाऊसाहेब राजळे, रावसाहेब मरकड, पर्यवेक्षिक अंजली चिंतामण, दिगबर पवार, गोरक्षनाथ सातपुते, सहदेव साळवे, संजय मरकड,अनिल मगर, बाळकृष्ण ठोंबळ, गणेश लबडे, शितलकुमार गोरे, दिपक बोडखे, हर्षद कचरे, शशिकांत सुर्यवशी, महेश ठोबंळ, अमोल कमानदार, वाबळे सर, दत्तात्रय देहडराय, हुशार राजु, वीर पांडुरंग, मुळे अजित, दिंडे सर, भालेराव सर, अनिता दारकुंडे, तुळसे कमल, शेलार सुरेखा, बडधे मोहिनी, भिसे अलका, रेखा आढाव यावेळी उपस्थित होते.
