राजूर येथे श्री दत्त मंदिरात 50 वा अखंड हरिनाम सप्ताहास सुरुवात.

विलास तुपे
राजूर/प्रतिनिधी
.गेली पन्नास वर्षे श्री दत्त महाराज मंदिरात अखंड हरिनामाचा गजर राजूर ग्रामस्थ व श्री दत्त मंदिर ट्रस्ट व मातोश्री हेमलताताई पिचड यांच्या समन्वयाने अध्यात्मिक यज्ञ सुरू असून राजूर परिसरात धार्मिक व आध्यात्मिक वाटेवर अनेक तरुण महिला पुढे येत असून चांगले कर्म केल्यास परमेश्वर साथ देतोच असे प्रतिपादन माजी आमदार वैभव पिचड यांनी राजूर येथे बोलताना केले
.राजूर येथील श्री दत्त महाराज५०वा अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते .त्यानिमित्त समाजातील अध्यात्मिक शैक्षणिक सामाजिक व दातृत्व गुण असलेल्या समाज बांधवांचा श्री दत्त महाराज व गगनगिरी महाराज यांच्या प्रतिमा,शाल श्रीफळ देऊन १११व्यक्तीचा सन्मान करण्यात आला यावेळी गगनगिरी महाराज आश्रमाचे संजयगीरी महाराज,योगी केशव महाराज,दत्त मंदिर ट्रस्ट च्या सौ.हेमलता पिचड,आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ठकाजी कानवडे ,बाळासाहेब देशमुख,सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण दातरे,प्राचार्या मंजुषा काळे, वनक्षेत्रपाल जयश्री साळवे,उपसरपंच संतोष बनसोडे,अरविंद देशमुख,माधव गभाले, पत्रकार शांताराम काळे, विलास तुपे, प्रकाश महाले विनायक घाटकर रजनी टिभे डॉ.बाबासाहेब गोडगे,डॉ.लांडे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

.प्रास्तविक प.पू.गगनगिरी महाराज प्रतिष्ठान अध्यक्षा सौ.हेमलता पिचड म्हणाल्या प.पू.गगनगिरी महाराज यांचे पाय २५वर्षांपूर्वी राजूर गावाला लागले तेथून पुढे गावाची भरभराट झाली माजी मंत्री पिचड यांनी गावाच्या विकासाला मोठा निधी दिला पाण्याच्या योजना आणल्या शेतीला पाणी दिले तर व्यसन मुक्त समाज होण्यासाठी गावातच नव्हे तर संपूर्ण परिसरात दारू बंदी केली,वृक्ष लागवडीचा मोठा कार्यक्रम हाती घेतला श्री दत्त महाराज यांचा सप्ताह गेली ५०वर्षांपासून लोकवर्गणीतून केला जातो .महाप्रसादाचे आयोजन केले जाते
प्रसंगी संजयगीरी महाराज म्हणाले पूजनीय गगन गिरी महाराज यांचे आशीर्वाद राजूर व पिचड कुटुंबियावर होते त्यामुळे राजूर परिसरात समृद्धी पाहायला मिळत आहे.तालुक्यातील गरीब आदिवासी माणसांना न्याय देण्याचे काम पिचड कुटुंबीय करत आहे .

तरयोगी केशव बाबा यांनी अध्यात्मिक कामातूनच देशाची व समाजाची प्रगती होत असते तरुण पिढीने या मार्गावर येऊन आपले कर्तृत्व सिद्ध करावे .तर आदिवासी सेवक ठकाजी कानवडे यांनी आज माझा सत्कार येथे केला तो माझा नसून सर्व आदिवासी समाज बांधव यांचा आहे.यावेळी १११सामाजिक कार्यकर्त्यांचा माजी आमदार वैभव पिचड,हेमलता पिचड,संजय गीरी महाराज,योगी केशव महाराज यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला सूत्र संचलन गोकुळ कानकाटे तर आभार उपसरपंच संतोष बनसोडे यांनी मानले