इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि ३०/१२/२०२३

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०९ शके १९४५
दिनांक :- ३०/१२/२०२३,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०७:०२,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:०२,
शक :- १९४५
संवत्सर :- शोभन
अयन :- उत्तरायण
ऋतु :- हेमंतऋतु
मास :- मार्गशीर्ष
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- तृतीया समाप्ति ०९:४४,
नक्षत्र :- आश्लेषा समाप्ति २९:४२,
योग :- विष्कंभ समाप्ति २६:५५,
करण :- बव समाप्ति २२:४७,
चंद्र राशि :- कर्क,
रविराशि – नक्षत्र :- धनु – पूर्वाषाढा,
गुरुराशि :- मेष,
शुक्रराशि :- वृश्चिक,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- स. १०नं. चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:४७ ते ११:०९ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०८:२४ ते ०९:४७ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५४ ते ११:०९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:१७ ते ०४:३९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
संकष्ट चतुर्थी (मुंबई चं.उ. २१:०९), घबाड २९:४२ नं., भद्रा ०९:४४ प., चतुर्थी श्राद्ध,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- पौष ०९ शके १९४५
दिनांक = ३०/१२/२०२३
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
भविष्याची फार चिंता करू नका. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील. तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. मानसिक दृष्ट्‍या सक्षम बनाल.

वृषभ
भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा. देवाणघेवाण करताना सावध राहावे. लहान भावाला दूर गावी जावे लागेल.

मिथुन
आज सुखद अनुभव येतील. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल. भावंडांसह नवीन काम सुरू करू शकता. चर्चा सकारात्मक असेल.

कर्क
वायफळ बडबड करणार्‍यांपासून दूर राहावे. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल. दिवस धावपळीत जाईल. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते.

सिंह
आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे. परोपकाराची जाणीव ठेवाल. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल.

कन्या
आज दिवस संमिश्र जाईल. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका. द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. अति विचार करणे टाळावे.

तूळ
शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील. पत्नीला खुश करता येईल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल.

वृश्चिक
आज मनाची संवेदनशीलता दाखवाल. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका. विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका.

धनू
आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल.

मकर
आपली क्षमता ओळखून काम करावे. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळावे. जुन्या गोष्टी आठवत बसू नका. कामाचा उरक वाढवावा.

कुंभ
जवळचा प्रवास चांगला होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल. पराक्रमाला चांगला वाव आहे. नातेसंबंधात सुधारणा होईल.

मीन
आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल. घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button