इतर

आश्रमशाळा मुख्याध्यापक संघाचे शहापूर येथे राज्यस्तरीय अधिवेशन..!


अकोले प्रतिनिधी

– अघाई (शहापूर) जि. ठाणे येथील आत्मामालिक इंटरनॅशनल स्कूल येथे महाराष्ट्र राज्य आश्रम शाळा मुख्याध्यापक संघाचे राज्यस्तरीय अधिवेशन दि.13 व 14 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले असल्याची माहिती मुख्याध्यापक संघाचे विभागीय अध्यक्ष श्री.अनिल कांबळे यांनी दिली.


अघाई येथील आत्मामालिक शैक्षणिक संकुलात भरणाऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उदघाटन शनिवार दि.13 जानेवारी रोजी ठिक 11.00 वाजता राज्याचे आदिवासी विकास मंत्री श्री. विजयकुमार गावित हे करणार असुन.आमदार निरंजन डावखरे,दौलत दरोडा,ज्ञानेश्वर म्हात्रे, सत्यजित तांबे तसेच आदिवासी विकास विभागाचे सचिव विजय वाघमारे, आदिवासी विकास आयुक्त नयना गुंडे, उपसचिव विजयसिंग वसावे अपर आयुक्त दिलीप मिना,रविंद्र ठाकरे नागपूर, तुषार माळी,नाशिक आयुक्तालय, संदिप गोलाईत नाशिक,सुरेश वानखेडे अमरावती व प्रकल्प अधिकारी राजेंद्र कुमार हिवाळे शहापूर, हे आदिवासी विकास विभागातील अधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.

दोन दिवशीय अधिवेशनात आश्रमशाळेतील शिक्षण व्यवस्थापनात मुख्याध्यापकाची भूमिका, आश्रमशाळा गुणवत्तावाढ व सर्वांगीण विकास कार्यक्रम, मुख्याध्यापक शालेय प्रशासन व व्यवस्थापन या विषयावरील परिसंवादात आदर्श ग्राम समिती सदस्य महा.राज्य भास्करराव पेरे, डाॅ.रत्नाकर आहेर,चंद्रकांत निंबाळकर, सिताराम कापसे (उपायुक्त),सिटु संघटणेचे राज्य अध्यक्ष डाॅ.दादासाहेब कराड हे उपस्थितांना उद्बोधित करणार आहेत.

अधिवेशनात आश्रमशाळा विकास या विषयावर दोन दिवस मंथन होणार असून राज्यातील आश्रमशाळा मुख्याध्यापक पदासाठी विविध ठराव घेतले जाणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष वामण रिंगणे यांनी दिली. तरी राज्यातील सर्व आश्रमशाळा मुख्याध्यापक यांनी दोन दिवसीय अधिवेशनासाठी ऊपस्थित रहाण्याचे आवाहन ठाणे विभागीय अध्यक्ष गणेश गावडे,अनिल सोनवणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button